शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८१ टक्के मतदान; आज मतमोजणी

By admin | Updated: April 23, 2015 00:49 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी काही ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याचा किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी काही ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याचा किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून, मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. लातूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे होईल. दरम्यान, जळकोट तालुक्यातील कुणकी येथील एका प्रभागातील उमेदवाराचे नाव चुकल्याने गुरुवारी फेरमतदान घेण्यात येणार आहे.लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी ६ हजार १४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण ११४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. ५ लाख ५२ हजार ३३६ मतदारांना मतदानाचा हक्क होता. यातील सरासरी ८३ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाले. बुधवारी उन्हाचा पारा तीव्र होता. तरीही मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते १०.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले होते. १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले. त्यानंतर पुन्हा मतदान वाढत गेले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. निवडणूक असलेल्या प्रत्येक गावांत पोलिस बंदोबस्त तैनात होता. दक्ष गावांत तर खास बंदोबस्त होता. जवळपास ५४ गावांना दक्ष गावे म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे या गावांमध्ये बंदोबस्ताचे प्रमाण अधिक होते. दरम्यान, जळकोट तालुक्यातील कुणकी येथील प्रभाग क्र. २ मध्ये ६१ मतदारांनी हक्क बजावला असताना एका उमेदवाराच्या अडनावात बदल झाल्याचे लक्षात आले. उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उमेदवारांच्या नावात चूक झाल्याचे सांगितले आणि फेरमतदानाची मागणी केली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने फेर निवडणुकीची परवानगी दिली असून, २३ एप्रिल रोजी सकाळी कुणकी येथील प्रभाग क्र. २ मध्ये फेरमतदान होणार आहे. शोभा शिवाजी मगर या प्रभाग क्र. २ मधून सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. मात्र मतपत्रिकेवर त्यांच्या नावात ‘शोभा शिवाजी पवार’ असे नाव छापून आले आहे. ‘मगर’ ऐवजी ‘पवार’ अडनाव छापून आले. त्यामुळे २३ एप्रिल रोजी या प्रभागात फेरमतदान होणार आहे. (प्रतिनिधी)