शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

७८७ आॅपरेटरांची होतेय् फरपट

By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST

रविंद्र भताने , चापोली ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसुत्रता व पारदर्शकता यावी़ यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आॅनलाईन करून थेट मंत्रालयाशी जोडण्यात आल्या आहेत़


रविंद्र भताने , चापोली
ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसुत्रता व पारदर्शकता यावी़ यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आॅनलाईन करून थेट मंत्रालयाशी जोडण्यात आल्या आहेत़ यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला महा आॅनलाईन कंपनीने एका आॅपरेटरची नियुक्ती केली आहे़ मात्र शासनाकडून ठरवून दिलेले मानधन या कंपनीकडून दिले जात नसल्याने संगणक आॅपरेटरवर उपासमारीचीच वेळ आली आहे़
एप्रिल २०११ संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प हाती घेऊन ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यात आल्या़ त्यावेळी परिपत्रक काढून सर्वच ग्रामपंचायतीला संगणक, प्रिंटर या साहित्यासह एक संगणक परिचालक पुरविण्याचे काम महा आॅनलाईन या कंपनीला दिले़ परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याला संगणक आॅपरेटरला ८ हजार रूपये मानधन देण्याचे नमूद केले आहे़ त्यासाठी शासनाकडून प्रत्येक आॅपरेटरमागे कंपनीला दरमहा ८ हजार रूपये दिले जातात़ परंतु, कंपनीकडून आॅपरेटरला मात्र केवळ २ हजार रूपये मानधन दिले जात आहे़
कंपनीकडून आॅपरेटरला डाटा एन्ट्रीचे टार्गेट दिले जाते़ ते टार्गेट तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक केले आहेत़ टार्गेट वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित आॅपरेटरचे मानधन कपात करण्याचे अधिकार कंपनीकडे आहेत़ मात्र तीन महिन्याचा कालावधी संपत नसला तरी पहिल्याच महिन्यात आॅपरेटरला कसलीही पुर्वसुचना न देता त्यांच्या मानधनात कपात केली जाते़ ग्रामपंचायतीमध्ये दरमहा आठ हजार रूपयांच्या पगारपत्रकावर आॅपरेटरच्या सह्या घेऊन त्यांच्या हातावर २ हजार रूपये दिले जातात़ याबाबत विचारणा केली तरी उत्तरे दिली जात नाहीत़
आॅपरेटरचा पगार महाआॅनलाईन कंपनीमार्फत होते. आम्ही फक्त आॅपरेटरची हजेरी दर महिन्याला कंपनीला देण्याचे काम करीत असल्याची माहिती चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांनी दिली.
४मानधनात कपात का होते, याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. कारण कंपनीची ती पॉलिसी आहे. मानधन हे मुख्य कार्यालयातून येते. मी कंपनीमधील व आपल्यामधील समन्वयक आहे. मानधनाबाबतचे निर्णय हे मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्याकडून घेतले जात असल्याची माहिती महाआॅनलाईन कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतीक मोलवंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.