शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

७१ निवृत्त प्राध्यापकांना तीन वेतनवाढीचा लाभ

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

औरंगाबाद : १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त केलेल्या ७१ सेवानिवृत्त प्राध्यापकांना तीन आगाऊ वेतनवाढीच्या फरकाचे धनादेश शनिवारी विद्यापीठात सभागृहात समारंभपूर्वक वितरित करण्यात आले.

औरंगाबाद : १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त केलेल्या ७१ सेवानिवृत्त प्राध्यापकांना तीन आगाऊ वेतनवाढीच्या फरकाचे धनादेश शनिवारी विद्यापीठात सभागृहात समारंभपूर्वक वितरित करण्यात आले. सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने तीन आगाऊ वेतनवाढी मिळण्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवरचा प्रदीर्घ लढा दिला. संघटनेच्या या लढ्याला अखेर यश आले. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सेवानिवृत्त प्राध्यापकांना आगाऊ वेतनवाढीच्या फरक रकमेच्या धनादेशांचे वितरण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. ए. वाहूळ, कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. एस. पी. झांबरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय लोमटे, डॉ. एच. ए. गणी, डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. डी. जी. धुळे, डॉ. नारायण शर्मा, डॉ. पारस बोरा यांची उपस्थिती होती. १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त संलग्नित महाविद्यालयीन प्राध्यापकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळालेला होता; पण विद्यापीठातील ७१ निवृत्त प्राध्यापक या वेतनवाढीपासून वंचित राहिले होते.त्यासाठी सेवानिवृत्त संघटनेने मोठा लढा दिला होता. धनादेश वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले की, विद्यापीठाच्या उभारणीत गेल्या ५० वर्षांमध्ये विविध विभागात कार्य केलेल्या प्राध्यापकांनी मोलाचे योगदान दिले आहे. या प्राध्यापकांना आगामी काळात विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल. कुलसचिव डॉ. माने प्रास्ताविकात म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त प्राध्यापकांचे स्नेहमिलन घडले. या प्राध्यापकांच्या हक्कासाठी विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध राहील. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वाहूळ यांनी सेवानिवृत्त प्राध्यापकांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी कुलसचिव डॉ. माने यांनी मोलाची मदत केल्याचा उल्लेख केला.