शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे ७०० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: September 3, 2015 00:28 IST

लातूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ या संपात बँका, आयुर्विमा महामंडळ,

लातूर : सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी लातुरात बुधवारी लाक्षणिक संप केला़ या संपात बँका, आयुर्विमा महामंडळ, राज्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना , महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी, आदींनी सहभाग घेतला होता़ संपामुळे बँका बंद असल्याने ७०० कोटींची उलाढाल ठप्प झाली़ केंद्र शासनाच्या कामगार धोरणाच्या विरुद्ध कर्मचारी संघटना एकवटल्या असून, बँक कर्मचारी संघटनेने संसदेवरही मोर्चा काढला होता़ आता विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़ बुधवारी झालेल्या संपात १० संघटना सहभागी झाल्या होत्या़ संपामुळे लातूर शहरातील तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार बंद होते़ परिणामी, बँकांतील सुमारे ७०० कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली़ संपात राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी़बी़ गायकवाड, व्यंकटेश हालिंगे, संजय कलशेट्टी उदय भावठाणकर, सुरेश नितळे, परिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्ष अरुण कदम, अध्यक्ष प्रतिभा पवार, उपाध्यक्ष भीमराव चक्रे, सुमित्रा तोटे, दीपक सोळुंके, उनिता देशमाने, राम सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी यांचाही सहभाग होता़ मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़ विश्वंभर भोसले, गोविंद निटूरे, सुभाष पाटील, व्ही़पीग़ायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती़ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना व राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या साडेचारशे कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयासमोर या दोन्ही संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ महाराष्ट्र औषध विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींच्या वतीनेही आंबेडकर पार्क येथे निदर्शने करण्यात आली़ या आंदोलनात प्रा़डॉ़विठ्ठल मोरे, विश्वंभर भोसले व वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता़ शासनाच्या निषेधार्थ लातूर बँक आॅफ महाराष्ट्र पासून सर्व बँक कर्मचाऱ्यांनी मुकमोर्चा काढला़ मूकमोर्चा सुभाष चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, गुळ मार्केट येथून स्टेट बँक आॅफ हैद्राबाद येथे मोर्चाचा समारोप झाला़ मोर्चात धनंजय कुलकर्णी, प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, दिपक माने, बाळकृष्ण धायगुडे, सरस्वती हेड्डा, संजीवनी गोजमगुंडे आदी सहभागी झाले होते़ राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी संपात असल्यामुळे बुधवारी जिल्हाभरातील बँकांचे सुमारे ७०० कोटींची उलाढाल ठप्प होती, असे बँक कर्मचारी संघटनेचे उत्तम होळीकर यांनी सांगितले़