शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

६५ टक्के बांधकामे अनधिकृत अवैध बांधकामांची नोंदच नाही

By admin | Updated: March 15, 2016 00:59 IST

परभणी : शहरातील अवैध बांधकामांच्या संदर्भात महापालिकेमध्ये कुठलीही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी बांधकाम परवाने तर घेतले. परंतु,

परभणी : शहरातील अवैध बांधकामांच्या संदर्भात महापालिकेमध्ये कुठलीही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी बांधकाम परवाने तर घेतले. परंतु, त्या परवान्यानुसार बांधकाम झाले का? वाढीव अवैध बांधकाम झाले आहे काय? याची आकडेवारी मनपाकडे उपलब्ध नसल्याने सर्रास अवैध बांधकामे झाली आहेत.नगरपालिकेचे महापालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतरही अनेक बाबतीत आकडेवारींचा अभाव आहे. परभणी शहरात किती जणांनी बांधकाम परवाने घेतले आहेत, किती जणांनी बांधकाम परवान्या व्यतिरिक्त बांधकाम केले, या अवैध बांधकामाविरुद्धची कारवाई, अशी कुठलीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. चार दिवसांपूर्वी राज्य शासनाने अवैध बांधकाम नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परभणी शहरातील किती बांधकामधारकांना लाभ मिळेल, तो कसा मिळेल, या विषयी माहिती घेण्यासाठी मनपाशी संपर्क साधला. त्यानुसार परभणी शहरात अवैध बांधकामे किती आहेत आणि किती जणांनी परवाना घेऊन बांधकामे केली, याची नोंद उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. प्रत्येक वर्षी सहाशे ते सातशे नागरिक बांधकाम परवाना काढतात, एवढीच माहिती उपलब्ध आहे. परंतु, काढलेल्या बांधकाम परवान्या व्यतिरिक्त जास्तीचे बांधकाम करणाऱ्यांची संख्या किती आहे, याची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कारवाईचा अथवा दंड वसुलीचा प्रश्नच नाही. (प्रतिनिधी) राज्य शासनाने नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा परभणी शहरातील अनधिकृत बांधकामधारकांनादेखील होणार आहे. अनाधिकृत बांधकामे नियमित करताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे.४ दंडात्मक शुल्क भरल्यानंतर सदर बांधकामधारकास त्याचे बांधकाम नियमित करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने अधिसूचना जारी केल्यानंतर प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होईल. परंतु, शासनाच्या या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामधारकांना देखील बांधकामे नियमित करण्याची मुभा राहणार आहे.नागरी भागात निवासी बांधकाम अथवा व्यावसायिक बांधकाम करावयाचे झाल्यास नगरपालिका, महानगरपालिकांकडून बांधकाम परवानगी घ्यावी लागते. परंतु, कमी बांधकाम परवानगी घेऊन परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्याचे प्रकार सर्रास होतात. शहरात साधारणत: ६५ टक्के बांधकामे अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, अनधिकृत बांधकामाविषयी महापालिकेतून अद्यापपर्यंत सर्वेक्षणही झालेले नाही.