शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

६० जणांना मोफत काशी विश्वनाथांचे दर्शन

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

राम तत्तापूरे ,अहमदपूर समाजातील अनेकांना आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे काशी विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही.

राम तत्तापूरे ,अहमदपूरसमाजातील अनेकांना आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे काशी विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही. काशी विश्वनाथांचे दर्शन व्हावे आणि आपल्या धार्मिक वृत्तीच्या पत्नीचे स्मरण कायम रहावे, या हेतूने येथील एका सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षकाने ६० जणांना मोफत काशी विश्वनाथांचे दर्शन घडविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला असून, या दर्शनासाठी भाविक रविवारी रवाना झाले आहेत. या अनोख्या उपक्रमाची सध्या शहरात कुतूहलाने चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर पैके यांचे पत्नीवर असलेल्या प्रेमाची या उपक्रमातून साक्ष मिळत आहे. अहमदपूर शहरातील सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक सांब काशिनाथअप्पा पैके यांच्या पत्नी शकुंतला यांचे दीड वर्षापूर्वी अकाली निधन झाले. हे दाम्पत्य धार्मिक वृत्तीचे असून, त्यांच्यावर वीरमठ संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे संस्कार आहेत. या पैके कुटुंबियाने चारवेळा भारत भ्रमण केले आहे. हे भारत भ्रमण करण्यात आले असले, तरी तीर्थयात्रा करण्याची शकुंतला पैके यांची इच्छा होती. मात्र काळाने त्यांना हिरावून नेल्याने ती इच्छा अपूर्णच राहिली. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण व्हावी, या हेतूने सांब पैके यांनी दहा दिवसांची तीर्थयात्रा करण्याची योजना आखली. यात ६० जणांना मोफत तीर्थक्षेत्राचेदर्शन घडविण्याचा त्यांनी मानस आखला. त्यानुसार रविवारी सकाळी येथील क्षिप्र गणेश मंदिरापासून तीर्थयात्रेसाठी भाविक रवाना झाले आहेत. या भाविकांना जबलपूर, चित्रकुट, वारानसी, शिवकाशी, अलाहाबाद, उज्जैन, महाकल्लेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव आदी देव-देवतांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. या तीर्थयात्रेत पैके यांच्या चार मुली तसेच नातेवाईक यांच्यासोबत बालपणातील निवडक मित्र सहभागी झाले आहेत. या सर्व भाविकांचा खर्च पैके हे स्वत: करणार आहेत.