शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीने अतिरिक्त सुरक्षा बिलातून जमविले ६ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:22 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीज ग्राहकांकडून प्रतिवर्षी अ‍ॅडिशनल सेक्युरिटी बिलाच्या नावाखाली रक्कम उकळत असून त्याचे ६0२५ कोटी रुपये जमा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीज ग्राहकांकडून प्रतिवर्षी अ‍ॅडिशनल सेक्युरिटी बिलाच्या नावाखाली रक्कम उकळत असून त्याचे ६0२५ कोटी रुपये जमा आहेत. त्यावर कोणतेही व्याज दिले जात नसल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे.नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट्स अँड युथ फ्रंट (एनएसओएसवायएफ) चे राज्य सहसचिव अ‍ॅड. स्वप्नील मुळे यांनी उर्जा मंत्रालयास माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. अतिरिक्त सुरक्षा बिल हे कोणत्या नियमानुसार घेता येते, त्याचा विनियोग कसा केला जातो, महाराष्ट्रात अशी किती रक्कम आपल्याकडे जमा आहे, हिंगोली जिल्ह्यातील किती ग्राहकांना ही अनामत रक्कम परत करण्यात आली आदी प्रश्न विचारले होते. यावर मंत्रालयातील कक्ष अधिकारी उ.ल.खोपडे यांनी हा अर्ज महावितरणच्या प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई येथील मुख्य कार्यकारी अभियंत्याकडे पाठवून माहिती देण्याचे निर्देश दिले. त्यांनी दिलेल्या माहितीमधून असे स्पष्ट झाले की, सदर रक्कम ही ग्राहकाने परत मागितली तर परत करणे आवश्यक आहे. परंतु ग्राहकांना हे माहिती नाही अन् महावितरण तशी जागृती करीत नाही. अशी प्रतिवर्षी भरलेली अनामत रक्कम जितके दिवस कंपनीकडे जमा असेल तेवढ्या वर्षांचे प्रतिवर्षी १०.७५% दराने व्याज ग्राहकांना मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्या पुढील बीलातून कपात करावे लागतात. परंतु ग्राहकांच्या आजवरच्या बिलांची तपासणी केली असता व्याजही नाही अन् बिलातून रक्कम कपातही होत नाही. उलट एक महिना बिल थकले की जोडणी तोडली जाते, असे मुळे यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात दि.३१ मार्च २०१७ अखेर महावितरणकडे सुरक्षा अनामतीची रक्कम रु.६०७५.६३ कोटी असून महावितरण त्यावर व्याज मिळवत आहे. मात्र ते ग्राहकांना दिले का जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. ते दिले जात नसल्यास हा शासनमान्य घोटाळाच असून हा विषय आमदारांनीच विधिमंडळात मांडणे आवश्यक आहे.