शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे दगडफेकीत ६ लाखांचे नुकसान

By admin | Updated: June 25, 2014 01:03 IST

बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा.

बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा. मागील पंधरवाड्यात झालेल्या तीन विविध घटनांमध्ये समाजाच्या दुखावलेल्या भावनांमुळे एसटीला तब्बल सहा लाखांचा फटका बसला आहे. मागील नऊ दिवसात सोशल मीडियावर महापुरूषांची विटंबना व इतर कारणांमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली.गोरगरीबांसाठी हक्काची गाडी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी ‘रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी एसटी प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखली जाते. प्रवासासाठी एसटीलाच पहिली पसंती मिळते. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असणारी ही बस मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा महापुरूषांच्या विटंबनेचे प्रकार असो किंवा राजकीय मुद्यांवरून पेटणारे आंदोलने असो, सर्वत्रच बसला टार्गेट करण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. दगडफेक जाळपोळ यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान होते. शिवाय बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होतात. (प्रतिनिधी)पंधरा दिवसांत ३० बस फोडल्यासोशल मीडियावर महापुरूषांची विटंबना करण्यात आली. समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने काही कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या तसेच काही बसगाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. या ३१ मे ते ९ जून या नऊ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात नऊ बसगाड्यांचा चुरा करण्यात आला. यामध्ये सहा लाख सहा हजारांचे नुकसान झाले, असल्याचे वाहतूक पर्यवेक्षक बाबा गर्कळ यांनी सांगितले.