शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक औरंगाबादमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:07 IST

महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

ठळक मुद्देशहरात दररोज ५ हजार ग्रामीणमधून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण बरेच

औरंगाबाद : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात बाहेरील नागरिक येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मागील चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक शहरात दाखल झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमधून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. असंख्य नागरिक पोलिसांची परवानगी घेऊन येत आहेत तर काही जण विनापरवाना येत आहेत. हर्सूल, जालना रोड, मुंबई रोड येथे मागील चार महिन्यांपासून २४ तास शहरात येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दररोज पाच हजारांहून जास्त नागरिक शहरात दाखल होत आहेत. शहराच्या आसपासच्या  गावांमधील नागरिक साहित्य खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे संख्या वाढल्याचे मनापाने सांगितले.

नागरिकांनी नियमांचे पालन करावेलॉकडाऊनला शंभर दिवस पूर्ण होत आले. मागील चार महिन्यांपासून कोरोना योद्धे आणि नागरिकांच्या मदतीने काम सुरू आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिका नजर ठेवून आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचा अवलंब करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, घराबाहेर कमीत कमी पडावे.-आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका प्रशासक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद