शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५० टक्के पाझर तलाव गळके !

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद सिंचन क्षमता वाढावी आणि तलावाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविली जावी या उद्देशाने जिल्हाभरात तब्बल सव्वापाचशे प्रकल्प उभारण्यात आले

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादसिंचन क्षमता वाढावी आणि तलावाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविली जावी या उद्देशाने जिल्हाभरात तब्बल सव्वापाचशे प्रकल्प उभारण्यात आले. आजघडीला जिल्ह्यामध्ये अशा स्वरुपाचे तलाव उभारणीसाठी ‘पॉर्इंट’ ही शिल्लक नाहीत. असे असतानाच दुसरीकडे २३१ तलाव दुरुस्तीला आले आहेत. आजघडीला हे तलाव केवळ नावालाच उरले आहेत. पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. याचा विस्तृत अहवाल जि.प. ‘लपा’ विभागाने तयार करुन जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे. यासाठी किमान २१ कोटी रुपये आवश्यक आहेत. जिल्ह्यामध्ये मागील तीन दशकामध्ये साठवण तलावांची मोठ्या प्रमाणात कामे झाली. विशेषत: १९७२ ते ७५ या कालावधीत सर्वाधिक कामे झाल्याचे नजरेस पडते. मात्र यातील अनेक तलावाच्या जलरोधक खंदकाची कामे तांत्रिकदृष्ट्या बरोबर झालेली नव्हती. त्यामुळे हे तलाव जरी सुस्थितीत असले तरी भरावाखालून पाणी वाहून जात आहे. तसेच अनेक तलावांचे सांडवे खराब झाले आहेत. भराव खचले आहेत. काही तलाव पावसामुळे फुटल्याने पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत. परिणामी ज्या उद्देशाने हे तलाव उभारण्यात आले होते तो उद्देश कुठेही साध्य होताना दिसत नाही. आजघडीला तलाव क्षेत्रांतर्गत येणाऱ्याना गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. ही एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल.मागील ३४ वर्षामध्ये जिल्ह्यात सुमारे सव्वापाचशे पाझर तलाव बांधण्यात आले. यापैकी ५० टक्के तलाव हे निरुपयोगी बनले आहेत. पावसाचे पाणी साचत नसल्याने पाणीटंचाईसोबतच सिंचनाचा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद तालुक्यात १२६ तलाव आहेत. त्यापैकी ५२ तलाव नादुरुस्त झाले आहेत. या तलावाच्या दुरुस्तीसाठी जवळपास पावणेतीन कोटी रुपये आवश्यक आहेत. तुळजापूर तालुक्यातील ९२ पैकी ४६ तलाव दुरुस्तीला आले आहेत. या तलावाच्या दुरुस्तीसाठी जवळपास पावणेचार कोटी रुपये अपेक्षित आहेत. कळंब तालुक्यातीलही ४३ तलाव दुरुस्त करावे लागणार आहेत. त्यासाठी किमान साडेचार कोटी रुपये आवश्यक आहेत. परंडा तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच २७ तलावांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी पावणेतीन कोटी रुपये लागणार आहेत. हीच अवस्था भूम तालुक्यातही आहे. भूम तालुक्यासाठीही जवळपास ४ कोटी रुपये लागणार आहेत. ४० तलाव नादुरुस्त आहेत. वाशी तालुक्यातील १० प्रकल्पांसाठी जवळपास १ कोटी रुपये आवश्यक आहेत. उमरगा तालुक्यातील सहा प्रकल्पांसाठी ४३ तर लोहारा तालुक्यातील ७ प्रकल्पांसाठी जवळपास अर्धा कोटी रुपये लागणार आहेत. एकूण तलावांचा विचार केला असता, २३१ तलाव दुरुस्त केल्याशिवाय गत्यंतर नाही. लोकप्रतिनिधींची उदासिनतातलाव सुस्थितीत असतील तर पाणी टंचार्ई निवारणावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचू शकतात. तसेच सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होते. याच उद्देशाने हे तलाव उभारण्यात आले. प्रत्यक्षात तलाव बांधण्यात आले असले तरी त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल कानाडोळा केला. त्यामुळे आजघडीला पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. ना सिंचनासाठी ना टंचाई निवारणासाठी याचा उपयोग होतो. असे असतानाही जिल्हा नियोजन समिती वा अन्य हेडमधून अत्यंत तुटपुंजा निधी या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दिला जात आहे. मागील वर्षी ५ लाख आणि यंदा २५ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे तलाव उभारणीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही केवळ दुरुस्त्याअभावी हा खर्च पाण्यात जात आहे.नादुरुस्त तलावतालुकासंख्याउस्मानाबाद ५२तुळजापूर४६कळंब४३परंडा२७भूम४०वाशी१०उमरगा०६लोहारा०७एकूण२३१