कार्यशाळेत ४१० प्राचार्य सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:24+5:302021-02-05T04:12:24+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्रात बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी आयोजित ...

410 principals will participate in the workshop | कार्यशाळेत ४१० प्राचार्य सहभागी होणार

कार्यशाळेत ४१० प्राचार्य सहभागी होणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्रात बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ४१० प्राचार्य सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचे उद‌्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते होणार असून अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर मार्गदर्शन करणार आहेत.

‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह‘ या विषयावर होणारी ही कार्यशाळा सकाळी ११ ते ५ ऑनलाइन पद्धतीने होणार असून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल. संबंधित कार्यशाळेत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. बी. बी. गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, प्र.कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सर्व प्राचार्य, प्रतिनिधी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. एन. एन. बंदेला व सहसंचालक डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांनी केले आहे.

Web Title: 410 principals will participate in the workshop