शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

२० जागांसाठी ४० जणांत ‘फाईट’

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

परळी : प्रतिष्ठेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ३६ जणांनी तलवारी म्यान केल्या.

परळी : प्रतिष्ठेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ३६ जणांनी तलवारी म्यान केल्या. २० जागांसाठी ४० उमेदवार नशीब आजमावत असून पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलमध्ये ‘स्ट्रेट फाईट’ होत आहे.वैद्यनाथ साखर कारखान्यावर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे या बहिणी स्वत: निवडणूक लढवित आहेत. दुसरीकडे कारखान्यात सत्तापालट करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पिता-पुत्र सरसावले आहेत. २६ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी १२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाणणीत पंडितराव मुंडे, धनंजय मुंंडे यांच्यासह २१ जणांचे अर्ज बाद ठरले. सहकारी संस्था या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पंडितराव मुंडे व भाजपाच्या वतीने नामदेवराव आघाव यांची उमेदवारी होती; परंतु दोघांचेही अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २० जागांसाठीच प्रक्रिया होत आहे. मंगळवारपर्यंत १०० पैकी २४ जणांनी माघार घेतली होती. शेवटच्या दिवशी ३६ जणांनी नामनिर्देशनपत्र काढून घेतले. त्यामुळे २० जागांसाठी ४० जण आमने- सामने आहेत. एकास एक उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव पॅनलला दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे नाव वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनल आहे. भाजपाने अनुभवी व तज्ज्ञ सभासदांना संचालकपदासाठी उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने भाजपाच्या तीन शिलेदारांना आपल्या तंबूत खेचले आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. कारखाना निवडणुकीला पहिल्यांदाच इतके मोठे स्वरुप आले आहे. प्रचारसभेत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडणार आहेत. (वार्ताहर)