शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !

By admin | Updated: July 21, 2016 01:12 IST

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़ परंतु, यातील ३ लाख ९३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु, या पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत जून-जुलैमध्ये २१४़१ मि़मी़ पाऊस झाला़ झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या केल्या़ आणखी पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कोळपणीही सुरू केली़ परंतु, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवरील पिके पावसाअभावी कोमेजू लागली आहेत़ पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. परंतु, यावर्षी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. परंतु, पुन्हा उघडीप दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.(प्रतिनिधी)