शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३६.२ मि. मी. पाऊस

By admin | Updated: July 9, 2014 00:50 IST

औरंगाबाद : महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी परतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा शहरात हजेरी लावली.

औरंगाबाद : महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी परतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा शहरात हजेरी लावली. निम्म्या शहरात दुपारनंतर चांगला पाऊस झाला. तर काही भाग कोरडाच राहिला. चिकलठाणा वेधशाळेत ३६.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरात कुठेही नुकसान झाले नाही. दरम्यान, रात्री आठ वाजेनंतर शहरातील सर्वच भागात रिमझिम पावसाला पुन्हा सुरुवात झाली. शहरात रविवारी रात्री महिनाभराच्या विश्रांतीनंतर समाधानकारक पाऊस झाला. बऱ्याच दिवसांनंतर पाऊस झाल्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. त्यात आज दुपारी आकाशात सर्वत्र काळे ढग दाटून आले. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे दुपारी ३.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. चिकलठाणा, सिडको, रेल्वेस्टेशन, गारखेडा, सातारा परिसर, देवळाई, हडको, हर्सूल आदी भागांत रिमझिम पाऊस झाला. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी शहरात पाऊस झाला. मात्र, भावसिंगपुरा, टाऊन हॉल, समर्थनगर, औरंगपुरा, विद्यापीठ परिसर, मिलकॉर्नर, घाटी परिसर आदी भागात पावसाचा थेंबही पडला नाही. शहरातील अनेक भागांत सुमारे तासभर रिमझिम पाऊस बरसत होता. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. मात्र, या पावसामुळे कुठेही नुकसान झाले नाही. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २४ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराचे तापमान दुपारनंतर अचानक खाली आले. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. आतापर्यंत ३९ मि. मी. पाऊसजिल्ह्यात चालू वर्षी १ जून ते ७ जून या काळात केवळ ३९ मि. मी. पाऊस झाला आहे. सरासरीचा विचार करता आतापर्यंत १७४ मि. मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पावसाची सरासरी खाली आली आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ७८ मि. मी. कमी पाऊस झाला आहे.