शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 06:08 IST

योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्नशील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर:  लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. कितीही अपप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यावर ३ हजार रुपये टाकणार आहे. ज्या महिलांनी ० बॅलेन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ १०० रुपये टाकणार आहे. त्यानंतर दोन महिन्याचे ३,००० रुपये जमा केले जातील. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली.

राज्य महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमासाठी जमलेली महिलांची गर्दी बघून मुख्यमंत्री त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याही यावेळी उपस्थित होत्या. 

विरोधकांना भीती 

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे. पण, ही योजना सुरू करण्यासाठी मी एक वर्षांपासून प्रयत्न करतोय. एक वर्षांपूर्वी निवडणुका होत्या का? योजना बंदी व्हावी म्हणून विरोधकांनी कोणाला तरी कोर्टात पाठवले आहे. त्यांना भीती वाटतेय की, या योजनेमुळे आता त्यांचे सरकार येणार नाही. ही योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्न करत आहेत. 

ये तो सिर्फ झाकी है! 

‘ये तो सिर्फ झाँकी है, अभी दो महिने बाकी है,’ असा सूचक इशारा देत शिंदे यांनी विरोधकांना डिवचले. बाजारात बर्नरचा मोठा तुटवडा आहे; त्यामुळे मोठी मागणी आहे; कारण विरोधकांना सध्या फार जळजळ होत असल्याची टीका त्यांनी केली. गर्दी पाहून शिंदे म्हणाले, अशा बहिणी मिळवायला नशीब लागते.  आजपर्यंत मला एकच सख्खी बहीण आहे, असे मी मानत होतो; पण मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आले की, लाखो बहिणी आहेत! 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेsillod-acसिल्लोड