शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या तिजोरीत २७ कोटी धुळखात !

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

आशपाक पठाण , लातूर प्रभागात रस्ता नाही, गटारी नाहीत, कर्मचारी नसल्याने काम होत नाही, विद्युत दिवे बंद पडले आहेत आदी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या प्रश्नाला प्रशासनाचे

आशपाक पठाण , लातूरप्रभागात रस्ता नाही, गटारी नाहीत, कर्मचारी नसल्याने काम होत नाही, विद्युत दिवे बंद पडले आहेत आदी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या प्रश्नाला प्रशासनाचे हे उत्तर ठरलेलेच़ महापालिका नवीन आहे, शासनाकडून निधी नाही त्यामुळे कामे नाहीत अशी ओरड करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या तिजोरीत एक दोन नव्हे तर तब्बल २७ कोटी रूपये शिल्लक आहेत़ निधी शिल्लक असल्याची कुणकुण नगरसेवकांना लागल्याने प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे़लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी ४ एप्रिल २०१३ रोजी २० कोटी रूपयांचे विशेष अनुदान मिळाले होते़ त्यापैकी केवळ २ कोटी १५ लाख ३२ हजार २०३ रूपये खर्च करण्यात आले़ या विशेष अनुदानातील १७ कोटी ८४ लाख ६७ हजार ७९७ रूपये तिजोरीत धुळखात पडले आहेत़ २०१२-१३ च्या टंचाई कालावधीसाठी तातडीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २८ मार्च २०१३ ते १० आॅक्टोबर २०१४ दरम्यान पाच टप्प्यात १ कोटी ९८ लाख ४९ हजार रूपये निधी प्राप्त झाला़ त्यापैकी १ कोटी ६० लाख २४ हजार २८७ रूपये खर्च करण्यात आले आहेत, यातून ३८ लाख २४ हजार ७१३ रूपये शिल्लक आहेत़ दलितेत्तर योजनेतून २६ मार्च २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत सात टप्प्यात २ कोटी ८९ लाख ५० हजार रूपये निधी मिळाला ९५ लाख १६ हजार ५९३ रूपये खर्च करण्यात आले असून १ कोटी ९३ लाख ३३ हजार ४०७ रूपये शिल्लक आहेत़ दलित वस्ती सुधार योजनेतील १९ नोव्हेंबर २०१२ ते ६ डिसेंबर २०१४ या कालावधीत पाच टप्प्यात आलेल्या ८ कोटी ९९ लाख ३० हजार रूपयांपैकी केवळ ४ कोटी ६६ लाख ५६ हजार ९३१ रूपये खर्च झाले असून ४ कोटी ३२ लाख ७३ हजार शिल्लक आहेत़ अग्निशमन बळकटीकरणासाठी ३ मे २०१३ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चार टप्प्यात २ कोटी १३ लाख ७१ हजार २२० रूपये अनुदान आले आहे़ यातील केवळ ५१ लाख ८५ हजार ५८० रूपये खर्च करण्यात आले आहेत़ १० डिसेंबर २०१४ मध्ये २ कोटी ४ लाख ४१ हजार ४११ रूपये अनुदान मिळाले आहे, त्यापैकी ३० लाख ८९ हजार ४२ रूपये खर्च करण्यात आले आहेत़ सहा योजनेच्या अनुदानातील रक्कम : चंद्रकांत चिकटे ४लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी विशेष अनुदान, दलित्तेतर योजना, दलितवस्ती सुधार योजना, रस्ता योजना,अग्निशमन बळकटीकरणासाठी आलेल्या अनुदानापैकी २७ कोटींची रक्कम शिल्लक आहे़ शासनाच्या विविध योजनेतून २०१२ ते २०१४ या कालावधीत महापालिकेला मिळालेल्या निधीतून कोट्यवधींचा निधी धुळखात पडला आहे़ मनपा प्रशासन निधी खर्च करण्यात अपयशी ठरल्याची तक्रार रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली आहे़ निवेदनासोबत त्यांनी शासनाचा प्राप्त निधी व शिल्लक निधीची यादीच त्यांनी जोडली आहे़ यासंदर्भात मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते़ त्यानंतर काम निश्चिती, अंदाजपत्रक तयार करणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाते़ एवढी सर्व प्रक्रिया झाल्यावर प्रशासकीय टेंडरची प्रक्रिया केली जाते़ या कामांसाठी वेळ लागतो़