शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

४३ पांदण रस्त्यांची २.३७ कोटींची देयके अडकली

By admin | Updated: June 24, 2014 00:13 IST

जालना : ४३ गावांमध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी उपोषण सुरू केले.

जालना : घनसावंगी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीअंतर्गत ४३ गावांमध्ये २०१२-१३ मध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके शासनाकडून अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र राजकीय मंडळींच्या मध्यस्थीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.१५ मे ते १५ जून २०१४ या कालावधीत शासनाने महात्मा गांधी नरेगा अंतर्गत २०१३-१४ व त्यापूर्वीची प्रलंबित मजुरी व देयके अदा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत घनसावंगी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ४३ गावांमध्ये झालेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची २ कोटी ३७ लाख रुपयांची देयके अदा झाली नाहीत.त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणार्थींमध्ये सुंदर काळे (लिंबोनी), श्रीरंग गुजर (अरगडे गव्हाण), पंढरीनाथ साबळे (कोठाळा), एकनाथ काळे (लिंबोनी), रामेश्वर चव्हाण (शिंदे वडगाव), पंढरीनाथ काळे, विठ्ठल नाईक (पाडोळी), किशोर जाधव (खडका) आणि मदन जाधव (खडका) यांचा सहभाग होता. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या अ‍ॅड. कीर्ती उढाण, सेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. सदस्य श्यामराव उढाण, भाऊसाहेब घुगे यांनी सायंकाळी ५ वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी मध्यस्थी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करण्याची मागणी केली. याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणार्थींनी मान्यवरांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)देयके अदा करणारशासनाच्या आदेशानुसार सदरील गावांमधील पांदण रस्त्याच्या खडीकरणाची देयके लवकरच अदा केली जातील, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी दिल्याचे उपोषणार्थींमधून सांगण्यात आले.