शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

२३३ दांडीबहाद्दर तलाठ्यांना नोटीस

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

बीड: जिल्हयातील ३७४ पैकी १०० तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ टीम लोकमत ने २४ जूनच्या अंकातून प्रसिध्द केले़

बीड: जिल्हयातील ३७४ पैकी १०० तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ टीम लोकमत ने २४ जूनच्या अंकातून प्रसिध्द केले़ तलाठी कार्यालयातील वास्तव महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले़ व बीड जिल्ह्यातील २३३ दांडी बहाद्दर तलाठ्यांना नोटिसा बजावून सज्जाच्या ठिकाणी हजर न राहिल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी तलाठ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे़‘टीम लोकमत’ ने तलाठी कार्यालयाचे ‘स्टींग’ केल्यानंतर जिल्हयातील तलाठी कार्यालयांची अवस्था जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली़ यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाने तात्काळ जिल्ह्यातील २३३ तलाठ्यांना नोटिसा बजावल्या असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख सुहास हजारे यांनी सांगितले़ आदेशानुसार तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणीच मुक्कामी असले पाहिजे असा नियम आहे़ मात्र सज्जाच्या ठिकाणी रहाणे तर सोडा; काही तलाठी तर दोन-दोन महिने कार्यालयांकडे फिरकतच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले़ अनेक तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या ‘क्लिप’ लोकमत कडे उपलब्ध आहेत़ आता तरी प्रशासन कारवाई करेल का? असा प्रश्न आता जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे़ (प्रतिनिधी)केवळ नोटीस नको, कारवाई करातलाठी वेळेवर कार्यालयात येत नाहीत़ तहसील कार्यालयात गेल्यावर तेथे ही भेटत नाहीत़ हा प्रकार आजचा नाही़ यामुळे शाळेतील विद्यार्थ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचींच कामे खोळंबतात़ हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू असताना देखील प्रशासन केवळ दंडात्मक कारवाई ची नोटीस देते़ आता दांडी बहाद्दर तलाठ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंगणी बु. चे सरपंच अंकुश गोरे यांनी केली. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय नाहीजिल्ह्यातील तलाठी सज्जावर वेळेवर येत नाहीत़ सज्जाच्या ठिकाणी राहत नाहीत़ याबाबत सखोल चौकशी केली जाईल़ एवढेच नाही तर मी जिल्ह्यातील सज्जांना अचानक भेटी देखील देणार आहे़ चुकीचे आढळून आल्यास तात्काळ संबधीत तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.