शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत विभागात २२ जणांच्या बदल्या

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

बीड : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागांतर्गत मंगळवारी २२ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनानुसार पार पडली़

बीड : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागांतर्गत मंगळवारी २२ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनानुसार पार पडली़ सहा विस्तार अधिकारी, दोन ग्रामविकास अधिकारी व १४ ग्रामसेवकांचा समावेश आहे़समुपदेशनानुसार जिल्हा परिषद सभागृहात बदल्या झाल्या. सीईओ राजीव जवळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी, कक्षाधिकारी एस़ एस़ गाडे उपस्थित होते़ बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी गोकुळ बागलाने यांची पाटोदा, अंबाजोगाई येथील विस्तार अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची केजला तर पाटोदा येथील बापू राख यांची बीड येथे प्रशासकीय बदली झाली़ या तीन प्रशासकीय बदल्या वगळता उर्वरित सर्व बदल्या विनंतीवरुन झाल्या़ माजलगावहून अरुण मोरे यांची बीडला, केजचे सुनील शिंदे शिरुरला तर रामचंद्र रोडेवाड यांची परळीहून माजलगावला बदली करण्यात आली़ परळी येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी साहेबा भताने यांची अंबाजोगाईला, धारुरचे पंडित जोशी यांची माजलगावला बदली झाली़ १४ ग्रामसेवकांच्या बदल्यामंगळवारी १४ ग्रामसेवकांच्या बदल्या पार पडल्या़ गेवराई पंचायत समितीतील भाऊसाहेब मिसाळ यांची बीड, गेवराईतीलच गहिनीनाथ मिसाळ यांचीही बीडला तर बीड येथील ओम चोपने यांची केजला बदली करण्यात आली़ बीडच्या मीरा धुमाळ यांना आष्टी, गेवराईचे किरण ठोंबरे केज, माजलगावचे राजाभाऊ जोगदंड यांना धारुरला हलविण्यात आले़ माजलगावातील सविता मुळे यांची केज, अजय कुलकर्णी यांची परळी, सुहास गायकवाड यांची धारुरला बदली झाली़ परळीतील अविनाश तोटे यांची माजलगावला बदली झाली़ गेवराईचे नंदकिशोर जाधव बीड, बीडचे सुनील वाघमारे गेवराई, बीडचे प्रकाश चव्हाण गेवराई व गेवराईचे अशोक चव्हाण यांची बीडला बदली करण्यात आली़ (प्रतिनिधी)लेखा विभागात बदल्या नव्हे ‘बदला’!एकाच विभागात पाच वर्षे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्याचा नियम आहे़ मात्र, हा नियम केवळ बांधकाम व लेखा विभागातच लागू करण्यात आला आहे़ लेखा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी दिगंबर गंगाधरे यांना बांधकाम विभागात हलविले आहे़ गंगाधरे यांनी नियमबाह्य कामांविरुद्ध नुकतेच आंदोलन केले़ तेंव्हापासून ते वरिष्ठांच्या निशाण्यावर होते़ त्यांची बदली नव्हे तर बदला घेतला अशी चर्चा बुधवारी लेखा विभागात होती़ बदल्यांची संचिका साहेबांसोबत !लेखा विभागातील बदल्यांची माहिती विचारली असता वरिष्ठ सहायक लेखा देशमुख म्हणाले, बदल्यांची संचिका वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांनी सोबत नेली आहे. ते दौऱ्यावर आहेत.