शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०,७२० प्रवेश क्षमता ; १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

उस्मानाबाद : मंगळवारी १० वी च्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आहे.

उस्मानाबाद : मंगळवारी १० वी च्या वर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ११ वी प्रवेशासाठी जिल्ह््यातील विद्यार्थी व पालकांची विविध महाविद्यालयात लगबग सुरु झाली आहे. कोणती शाखा निवडावी हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतोच. त्यामुळे यापुढे मिशन अ‍ॅडमिशन सुरु होते. आपण ज्या शाखेत प्रवेश घेणार आहोत त्यांच्या संबंधित जिल्ह्यात, शहरात किती महाविद्यालये आहेत, किती जागा रिक्त आहेत याची उत्सकता सर्वानाच असते. जिल्ह्यातील संयुक्त, कला, वाणिज्य व विज्ञान या अभ्यासक्रमाच्या किती जागा आणि किती तुकड्या याबाबत घेतलेला हा लेखाजोखा.मागील तीन वर्षापासून जिल्ह्याचा निकाल सातत्याने उंचावत आहे. यावर्षीही तब्बल साडेसात टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. आता या विद्यार्थ्यांचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’ सुरु झाले आहे. जिल्ह््यातही पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड शिक्षण देणारी महाविद्यालयेही नावारुपाला आली आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नामांकीत महाविद्यालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा हळुहळु कमी होवू लागला आहे. मंगळवारी दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत १७ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांची मिळून २० हजार ७२० इतकी प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थी आणि प्रवेश क्षमतेचा विचार केला असता, किमान पावणेतीन हजार विद्यार्थी कमी पडत आहेत. दरम्यान गतवर्षी १५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनीच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जवळपास ५ हजार ३३२ जागा रिक्त राहिल्या होत्या. हे चित्र बदलण्यासाठी यावेळी महाविद्यालयांना कंबर कसावी लागणार आहे. (प्रतिनिधी)विज्ञान शाखेसाठी ६ हजारावर जागाजिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयात कला, विज्ञान आणि संयुक्त या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या २० हजार ७२० इतक्या जागा आहेत. यामध्ये कला शाखेची प्रवेश क्षमता ११ हजार ८८०, विज्ञान ६ हजार ४८०, वाणिज्य १ हजार ८०० तर संयुक्त अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ५६० इतकी असल्याचे सांगण्यात आले.मंजूर तुकड्याकला१३२विज्ञान६८वाणिज्य १७संयुक्त ०६एकूण २२३