शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

१६४ गावांचा कारभार झीरो तलाठ्यांच्या हाती

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्‍या १६४ गावांचा कारभार वार्‍यावर आहे.

 विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्‍या १६४ गावांचा कारभार वार्‍यावर असून येथील सजा झीरो तलाठी सांभाळत आहेत. तालुक्यातील ‘अप्पा मंडळी’ घरभाडे वसूल करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. वैजापूर शहराचा अपवाद वगळता तालुक्यात मुख्यालयी एकही तलाठी राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागाचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. तलाठ्यांना मूळ वेतन व गे्रडपेच्या एकूण १० टक्के घरभाडे भत्ता मिळतो; परंतु शासनाकडून घरभाडे भत्ता वसूल केला जातो; मात्र मुख्यालयी राहण्याच्या नावाने सर्वांचीच बोंबाबोब आहे. तालुक्यात वैजापूर,वैजापूर ग्रामीण, नांदगाव, घायगाव, सुराळा, खंडाळा, कोल्ही, जानेफळ, आघूर, जरूळ, शिऊर, बळहेगाव, रघुनाथपूरवाडी, मनेगाव, गारज, मनूर, मांडकी, पोखरी, लासूरगाव, जळगाव, दहेगाव, पालखेड, भगूर, करंजगाव, महालगाव, डवाळा, सिरसगाव, चोरवाघलगाव, गाढेपिंपळगाव, जांबरगाव, लाडगाव, विरगाव, सावखेडगंगा, पुरणगाव, बाबतारा, भऊर, नागमठाण, डाकपिंपळगाव, बाजाठाण, हमरापूर, जातेगाव, वांजरगाव, लोणी खुर्द, वाकला, तलवाडा, अंचलगाव, खरज, पारळा, बोरसर, परसोडा, नालेगाव, भिवगाव, धोंदलगाव व शिवराई, बिलोणी अशी एकूण ५९ तलाठी सजा कार्यालये आहेत. आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी संबंधित तलाठी मंडळी फक्त आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी लावतात. त्यामुळे आठवड्यातील अन्य दिवशी काम पडल्यास ग्रामस्थांना या तलाठ्यांना शोधत बसण्याची वेळ येते किंवा आठवडाभर त्याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी हे जिल्हा अथवा तालुक्याच्या ठिकाणी राहून ये-जा करतात. तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने जात, रहिवासी व उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर अडचणी येतात. आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे लागणार्‍या विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु तलाठी महाशय गावात राहतच नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. झीरो तलाठ्यांवर वचक नसल्याने अनागोंदी दरम्यान, तालुक्याच्या ग्रामीण भागात एकही तलाठी राहत नसल्याने या गावांचा कारभार ‘झीरो’ तलाठ्यांच्या भरवशावर सुरू आहे. जवळपास सर्वच अप्पा मंडळींकडे झीरो तलाठी असल्याने ते गावाकडे फारसे फिरकत नाही. वैजापूर शहरालगतची जी गावे आहेत, त्या सर्व गावांचा कारभार वैजापूर शहरातूनच चालतो. त्यांनी शहरातच कार्यालये थाटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी उंबरे झिजवावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून असाच हा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्या या गलथान व ढिसाळ कारभारावर ना लोकप्रतिनिधींचा वचक आहे ना वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांचा.