इटावा रोडच्या एक किलोमीटर अंतरात १६ गतिरोधक; गाड्यांचं नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:42 IST2026-01-23T15:41:26+5:302026-01-23T15:42:19+5:30

रस्ता आहे की गतिरोधकांचं प्रदर्शन? एका किलोमीटरमध्ये १६ धक्के; वाहनधारकांच्या मणक्याचं काय?

16 speed bumps within one kilometer of Etawah Road, will they prevent accidents or increase them? | इटावा रोडच्या एक किलोमीटर अंतरात १६ गतिरोधक; गाड्यांचं नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

इटावा रोडच्या एक किलोमीटर अंतरात १६ गतिरोधक; गाड्यांचं नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

वाळूज महानगर : इटावा ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर अवघ्या एक किलोमीटर अंतरात तब्बल १६ गतिरोधक उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हे गतिरोधक कोणत्याही शासकीय नियम, मापदंड किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उभारलेले नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, तसेच मालवाहू वाहने ये-जा करतात. मात्र, अचानक उभे करण्यात आलेले, उंची व रुंदीमध्ये असमान असलेले हे गतिरोधक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक चारचाकी वाहनांचे तळ भाग या गतिरोधकांना घासत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघातही घडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

गतिरोधकांपूर्वी सूचनाफलक, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे पट्टे, रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक दिसत नसल्याने ब्रेक मारताच वाहन घसरत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक आवश्यक असले तरी ते नियमानुसार, योग्य अंतर ठेवून आणि शास्त्रीय पद्धतीने उभारणे गरजेचे आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित प्रशासन व ग्रामपंचायतीने तातडीने दखल घ्यावी. आवश्यक ठिकाणी शासनाच्या निकषांनुसारच गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी वाहनचालक, ग्रामस्थ व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या संबंधी विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title : एक किलोमीटर में 16 स्पीड ब्रेकर, दुर्घटनाएँ, वाहन क्षतिग्रस्त

Web Summary : इटावा रोड पर एक किलोमीटर के भीतर 16 अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर से ग्रामीण नाराज हैं। रिफ्लेक्टर की कमी और असमान निर्माण के कारण वाहन क्षतिग्रस्त होते हैं, दुर्घटनाएँ होती हैं। निवासियों ने आगे की घटनाओं को रोकने के लिए स्पीड ब्रेकर के विनियमन और उचित कार्यान्वयन की मांग की।

Web Title : 16 Speed Breakers in One KM Cause Accidents, Damage Vehicles

Web Summary : Villagers are angry about 16 unscientific speed breakers within one kilometer on Itawa road. Vehicles are damaged, accidents occur due to missing reflectors and uneven construction. Locals demand regulation and proper implementation of speed breakers to prevent further incidents.