१५ स्वस्त धान्य दुकाने रडारववर

By Admin | Updated: May 9, 2016 23:53 IST2016-05-09T23:49:44+5:302016-05-09T23:53:40+5:30

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे, अभिलेख अद्ययावत न ठेवणे, तपासणीकामी सहकार्य न करणे आदी चुकांचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यातील

15 cheapest grain shops on the radar | १५ स्वस्त धान्य दुकाने रडारववर

१५ स्वस्त धान्य दुकाने रडारववर

धाबे दणाणले : नेकनूर येथील अर्ध घाऊक केरोसीन परवाना निलंबित
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड
वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे, अभिलेख अद्ययावत न ठेवणे, तपासणीकामी सहकार्य न करणे आदी चुकांचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यातील १५ स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून शनिवारी नेकनूर येथील अर्धघाऊक केरोसीन परवाना निलंबित केला आहे.
दुष्काळी परिस्थितीत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे. या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली होती. यामध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात दोन हजारांवर रेशन दुकाने आहेत. दोषी आढळणाऱ्या १५ स्वस्त धान्य दुकानांवर पहिल्या टप्प्यात कारवाई होणार आहे. याचाच एक भाग म्हणून बीड तालुक्यातील नेकनूर येथील खाजर शेख यांच्या अर्धघाऊक केरोसीन परवान्याची २१ मार्च दरम्यान तपासणी केली. मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने परवाना निलंबित केल्याची माहिती पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

Web Title: 15 cheapest grain shops on the radar