पदवी परीक्षेत १४ ‘रस्टिकेट’!

By Admin | Updated: December 19, 2014 00:58 IST2014-12-19T00:36:34+5:302014-12-19T00:58:24+5:30

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या पदवी परीक्षांमध्ये कॉप्या करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांना गुरुवारी भरारी पथकाने रंगेहाथ पकडले.

14 'Rusticate' in the degree test! | पदवी परीक्षेत १४ ‘रस्टिकेट’!

पदवी परीक्षेत १४ ‘रस्टिकेट’!


बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या पदवी परीक्षांमध्ये कॉप्या करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांना गुरुवारी भरारी पथकाने रंगेहाथ पकडले. त्या सर्वांवर रस्टिकेटची कारवाई केली.
विद्यापीठामार्फत जिल्ह्यात १ डिसेंबरपासून बीसीए, बीसीएस, अभियांत्रिकी परीक्षा सुरु आहेत. ५ जानेवारी २०१५ पर्यंत या परीक्षा पार पडणार आहेत. गुरुवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत बीएसीएस तर दुपारी २ ते ४ या वेळेत बीसीएसचा पेपर झाला. शिवाय १० ते १२ या दरम्यान अभियांत्रिकीचा पेपर पार पडला. यावेळी भरारी पथकाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देशमुख यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन परीक्षार्थींची झाडाझडती घेतली. प्रा. डॉ. नंदकुमार मुळी, प्रा. कमलकिशोर लड्डा, प्रा. डॉ. नारायण शिंदे यांचा पथकात समावेश होता. परीक्षेदरम्यान, अनुचित प्रकार केल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत केंद्रप्रमुखांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रा. डॉ. देशमुख यांनी केले़ (प्रतिनिधी)४
बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालय व माजलगावातील सिद्धेश्वर महाविद्यालयात सर्वाधिक कॉपीबहाद्दर आढळले. या दोन्ही महाविद्यालयांत पथकाच्या गळाला प्रत्येकी ५ परीक्षार्थी लागले. वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयात एक तर केज येथील तांबेश्वर महाविद्यालयात तिघांना कॉप्यासह पकडले. या सर्वांना रस्टिकेटच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

Web Title: 14 'Rusticate' in the degree test!