शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीत अडकले शिक्षकांचे १४ कोटी

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

बीड: कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे १४ कोटी ४० लाख रुपये आजही थकित आहेत़

बीड: कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे १४ कोटी ४० लाख रुपये आजही थकित आहेत़ त्यामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत़ जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे सप्टेंबर व आॅक्टोबर २०१२ या दोन महिन्यातील भविष्य निर्वाह निधीचे १३ कोटी ६९ लाख १३ हजार ३९१ रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होते़ ते अद्यापही शिक्षकांना मिळालेले नाहीत़ याशिवाय पोस्ट खात्याची आरडी, एलआयसी, सेवानिवृत्तांचे वेतन असे मिळून ७० लाख ८० हजार ५८१ रुपये देखील बँकेकडेच आहेत़ ते देखील शिक्षकांना मिळाले नाहीत़ हक्काच्या पुंजीसाठी शिक्षक जिल्हा बँकेमध्ये खेटे मारत आहेत; परंतु बँकेकडून त्यांची हेळसांड होत आहे़ पैसे मिळत नसल्याने शिक्षक हतबल झाले आहेत़ अनेक शिक्षकांच्या पाल्यांची लग्ने, घरांचे बांधकाम रखडले आहेत़ अडवणूक थांबवादरम्यान, शिक्षकांसाठी जिल्हा बँकेने ध्येयपूर्ती योजना सुरु केली होती़ कर्जदार शिक्षकांना मुदतीच्या आत नोटिसा धाडून सक्तीने कर्जवसुली करण्यात आली़ आता मात्र, शिक्षकांच्या कष्टाचा पैसा जिल्हा बँक परत करायला तयार नाही़ त्यामुळे शिक्षकांची अडवणूक थांबवून तात्काळ रक्कम परत करावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र खेडकर, अरुण खुले, जिल्हाध्यक्ष रशीद खान, सचिव दिलीप खाडे, कार्याध्यक्ष सुनील म्हेत्रे, कोषाध्यक्ष शेख रशीद यांनी बँकेचे प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ आंदोलनाचा इशाराही खेडकर यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील शेकडो शिक्षकांचे हाल.भविष्य निर्वाह निधीचे १३ कोटी ६९ लाख. तर एलआयसीचे ७० लाख ८० हजार रुपये जिल्हा बँकेत आहेत जमा.वारंवार खेटे घालूनही शिक्षकांच्या पदरी निराशा.कष्टाचा पैसा अडकल्याने शिक्षकात नाराजी.पैसे तात्काळ देण्याची शिक्षक संघटनेची मागणी.