शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 15:03 IST

Heavy Rain Hits Marathwada : अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड

ठळक मुद्देप्राथमिक पाहणीचा अंदाजक्षेत्र कमी-जास्त होण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टरवरील पिकांचा अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain Hits Marathwada ) चिखल झाला आहे. प्राथमिक पाहणीच्या अंदाजानुसार ही आकडेवारी समोर आली असून, आठ दिवसांनंतर किती क्षेत्रफळाचे नुकसान झाले हे समोर येईल, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, मका, सोयाबीनसह कडधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे.

प्राथमिक पाहणीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख ७२ हजार १५ हेक्टर, जालना जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ६६६, परभणी एक लाख ६१ हजार २७, हिंंगोली जिल्ह्यात आठ हजार ९१९, तर नांदेड जिल्ह्यात तीन लाख ७१ हजार ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील पाच लाख १९ हजार ४२५ हेक्टर, लातूर सहा हजार २२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १४ लाख ७४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेल्याचे यातून दिसते आहे. आयुक्तालय सूत्रांनी सांगितले, २० टक्क्यांच्या आसपास पंचनामे झाले आहेत. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण होणे शक्य आहे. सध्या नजर अंदाजानुसार पंचनामे होत आहेत. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड आहे. त्यामुळे प्राथमिक आकडेवारीत कमी-अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.

हेही वाचा - मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात

मराठवाडा @ ८१८.८ मिलीमीटर; १३९ मि.मी.अतिरिक्त पाऊसमराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या ६७९.५ मिलीमीटर तुलनेत १५ सप्टेंबरपर्यंत ८१८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा १३९.३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. यामुळे विभागातील खरीप हंंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि उस्मानाबादवगळता सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. सर्व जिल्ह्यांची वार्षिक सरासरी पूर्ण झाल्याचे पावसाच्या नोंदीवरून दिसते आहे. तीन दिवसांपासून विभागात पावसाने उघडीप दिली आहे.

विभागात जिल्हानिहाय झालेला पाऊस असाजिल्हा-----वार्षिक सरासरी-----झालेला पाऊस-----टक्केवारीऔरंगाबाद --५८१.७ मि.मी.-----७१९.८ मि.मी.------१२३.७४ टक्केजालना---- ६०३.१ मि.मी.------८६४.३ मि.मी.------१४३.४१ टक्केबीड-----५६६.१ मि.मी.------७७१.५ मि.मी.-------१३६.२८ टक्केलातूर----७०६.०० मि.मी.-----७२७.०० मि.मी.------१०२.९७ टक्केउस्मानाबाद--६०३.१ मि.मी.----६३९.९ मि.मी.-------१०५.६० टक्केनांदेड-----८१४.४ मि.मी-----९९१.३ मि.मी.-------१२१.७२ टक्केपरभणी----७६१.३ मि.मी.----९०३.४ मि.मी.-------११८.६७ टक्केहिंगोली ---७९५.३ मि.मी.-----८८४.८ मि.मी.------१११.२५ टक्केएकूण----६७९.५ मि.मी. -----८१८.८ मि.मी.------१२०.५० टक्के

हेही वाचा - 'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेती