शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बायपाससाठी १३.५० कोटी

By admin | Updated: April 21, 2015 00:54 IST

रऊफ शेख , फुलंब्री औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फुलंब्री येथे वळण रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात जमीन संपादन करण्याचे काम सुरू

रऊफ शेख , फुलंब्रीऔरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फुलंब्री येथे वळण रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात जमीन संपादन करण्याचे काम सुरू करून चौपदरीकरणासोबत काम पूर्ण होणार आहे. औरंगाबाद-जळगाव राज्य रस्ता क्रमांक आठचे चौपदरीकरण व फुलंब्री येथील वळण रस्त्याला मंजुरी मिळून चार वर्षे झाली; पण पुढील प्रकियेला उशीर झाला. आता फुलंब्री येथील वळण रस्त्यासाठी राज्य सरकारने साडेतेरा कोटी रुपये मंजूर केले. हा निधी जमीन संपादनासाठी वापरला जाईल. औरंगाबाद रस्त्यावरील गट क्रमांक १०२ पासून ३२० पर्यंत सुमारे साडेपाच कि़ मी. लांब व तीस मीटर रुंद हा रस्ता होणार आहे.रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर साडेतीन कोटी रुपयेच मंजूर झाले होते. ते वाढवून आता साडेतेरा कोटी झाले आहेत. जमीन संपादन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाली आहे. येत्या महिनाभरात प्रक्रिया सुरू होणार आहे. जमीन संपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ शकते. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासोबत फुलंब्रीत वळण रस्ताही होणार असून चौपदरीकरणाच्या कामासोबतच हे काम हाती घेतले जाणार आहे. फुलंब्री येथील औरंगाबाद-जळगाव राज्य रस्त्यावरील वळण रस्त्याच्या कामासाठी शासनाने साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद केली असून या कामाची लवकरच सुरुवात होईल, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग के. आर. गाडेकर यांनी सांगितले.