शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१३ टक्के पाऊस

By admin | Updated: August 20, 2014 23:54 IST

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़ अर्धा पावसाळा सरल्यानंतरही केवळ १३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाल्याने पिकांबरोबरच पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चालला आहे़जिल्ह्यात सरासरी ७५० मिमी पाऊस होतो़ आतापर्यंतचा इतिहास पाहता पावसाळ्यात जरी ताण पडला तरी संपूर्ण वर्षभरात सरासरी गाठली जाते़ त्यामुळे पाण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही़ परंतु, यावर्षी मात्र आतापर्यंतच्या पावसाळ्यांशी तुलना करता खूपच कमी पाऊस झालेला आहे़ केवळ १३ टक्के पाऊस झाल्याने पिके तर माना टाकू लागली आहेत़ जमिनीची पाणी पातळी देखील खोल जात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे़ प्रकल्प आणि धरणांमधील पाणी पातळी देखील तळ गाठू लागली आहे़ पावसाळ्यातील पाण्याचा संचय झाल्यानंतर उन्हाळ्यात हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते़ परंतु, पावसाळ्यातच धरण आणि प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे आगामी काळातील प्रश्न अधिकच गंभीर दिसू लागला आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत १३५़९३ मिमी पाऊस झाला़ सेलू तालुक्यात सर्वाधिक १५५़८ मिमी तर पालम तालुक्यात सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला़ मागच्या वर्षी हीच परिस्थिती उलटी होती़ जिल्ह्यात ६१०़६३ मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला होता़ परंतु, यावर्षी मात्र केवळ १३ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळातील संकट डोळ्यासमोर दिसू लागले आहे़ आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला आहे़ पाऊस जरी होत नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण होते़ परिणामी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही बिकट स्थितीतून जिल्हावासिय जात आहेत़ (प्रतिनिधी)वेधशाळेचा आशादायक अंदाजपुणे येथील भारतीय वेधशाळेने आगामी चार दिवसांत मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे हा अंदाज आशादायक वाटू लागला आहे़ वेधशाळेच्या या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात ६१ मिमी, लातूर १०० मिमी, नांदेड ८१ मिमी, औरंगाबाद ३२ मिमी, हिंगोली ५८ मिमी, बीड ६७ मिमी आणि जालना जिल्ह्यामध्ये ३८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे़ या अंदाजानुसार पावसाचे पुनरागमन व्हावे, अशीच प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत़ टंचाईग्रस्त गावे वाढलीपावसाळ्यामध्येच पाण्याची टंचाई निर्माण होत आहे़ मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही ही समस्या जाणवू लागली आहे़ दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली असल्याने या संदर्भात प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे़