शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
5
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
6
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
7
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
8
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
9
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
10
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
11
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
12
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
13
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
14
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
15
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
16
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
17
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
18
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
19
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
20
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटांत १२ विषय मंजूर !

By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST

जालना : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अवघ्या पाच मिनिटांत १२ विषय सर्वसंमतीने चर्चेविनाच मंजूर झाले.

जालना : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अवघ्या पाच मिनिटांत १२ विषय सर्वसंमतीने चर्चेविनाच मंजूर झाले. पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सभा होती. कारण नूतन नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रियाही आजपासूनच सुरू झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक पापाखान यांच्या निधनाबद्दल सभागृहाने त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली. त्यानंतर आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगराध्यक्षा भरतिया, उपाध्यक्ष राऊत व मुख्याधिकारी मनोहरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण सभेतील सर्व विषयांना मंजुरी अशा आवाजात उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांनी १२ विषयांना मंजुरी दिली.यामध्ये २७ फेबु्रवारी २०१४ रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्तांत कायम करणे, नगरपरिषद शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेऊन वेतन करणे याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, शिक्षण विभागातील शिक्षकांचा पगार आॅनलाईन झाल्यामुळे या विभागास लाईटसाठी इन्व्हर्टर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणे, उपनगराध्यक्षांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे, प्रत्येक प्रभागात एल.ई.डी. लाईट बसविण्याकरिता ५ लाख रुपयांपर्यंत प्रशासकीय व वित्तीय मान्यता, शहरात महत्वाच्या ठिकाणी हायमॅक्स बसविणे, नगरपालिका पाणीपुरवठा व न.प. कार्यालयात सेक्युरिटी गार्ड एजन्सीमार्फत नियुक्त करणे, शहरातील विविध ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविणे, शहरात पार्किंग झोन व तसेच वाणिज्य जागा विकसित करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे इत्यादी विषयांना मान्यता देण्यात आली. पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत व इतर विविध शासकीय योजना अंतर्गत या वित्तीय वर्षासाठी अनुदान मागणीबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणे बाबत चर्चा करून निर्णय घेणे या विषयांनाही मंजुरी देण्यात आली. विकास योजनेअंतर्गत रेल्वेस्टेशन रोड ते अंबड चौफुली ते मंठा चौफुली वळण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्याकरिता प्रस्ताव तयार जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीस्तव पाठविण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी पथदर्शक फलक लावणे, वृक्षलागवड करणे, मोतीबागेत नौका विहार सुरू करणे, मोती तलाव येथे तसेच गांधी चमन उद्यान येथे कारंजे बसविणे इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रशीद पहेलवान म्हणाले की, २७ व्यावसायिक मालमत्ताधारकांना थकीत रक्कमेबाबत पालिकेने नोटीस बजावली. मात्र ज्या रकमेसाठी ही नोटीस बजावली, ती रक्कम नंतर कमी केली, असा आरोप केला. (प्रतिनिधी)