शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यात ११५ वर्ग वाढणार !

By admin | Updated: June 8, 2014 00:53 IST

मधुकर सिरसट , केज बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार २००९ प्रमाणे केज तालुक्यातील १०७ प्राथमिक शाळेत १६ जून पासून पाचवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

मधुकर सिरसट , केजबालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार २००९ प्रमाणे केज तालुक्यातील १०७ प्राथमिक शाळेत १६ जून पासून पाचवीचे वर्ग सुरू होणार आहेत. आठवीचे वर्ग फक्त आठ शाळेला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ११५ वर्गांची भर यामध्ये आणखी पडणार आहे. त्यासाठी ११५ शिक्षकांचीही त्या वर्गांसाठी नियुक्ती होणार असून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना तसे आदेश वितरित करण्यात आले आहेत. केज तालुक्यात सध्या २२२ प्राथमिक आणि ७ माध्यमिक अशा एकूण २२७ शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालतात. सध्या लाभार्थ्यांना अध्यापनाची कामे करण्याकरिता एकूण ७९५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात पाचवीचे १०७ वर्ग आणि आठवीचे आठ वर्ग मिळून एकूण ११५ वर्गांची भर पडणार आहे. सध्याच्या ७९५ शिक्षकांतही ११५ शिक्षकांची भर पडून शिक्षकांची एकूण संख्या ९१० होणार आहे. पाचवीचा वर्ग १ कि.मी.च्या आत अंतर असलेल्या शाळेत उघडण्यात येणार असून आठवीच्या वर्गासाठी ३ कि.मी. एवढे किमान अंतर निश्चित करण्यात आले आहेत. केज तालुक्यात एकूण १५ केंद्रीय शाळा असून केंद्र प्रमुखामार्फत त्या-त्या केंद्राचा कारभार चालतो. आठवीच्या उघडण्यात येणाऱ्या शाळेत सातेफळ, पिसेगाव, कोठी, नागझरी, सादोळा, पळसखेडा, बुरंडवाडी आणि घाटेवाडी या शाळांचा समावेश आहे. यामुळे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय गावातील शाळेतच होणार आहे. गुगल मॅपिंगवर नोंददोन शाळेतील प्रत्यक्ष अचूक अंतर नोंदविण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे गुगल मॅपिंग डाऊनलोड करून केज तालुक्यातील प्रत्येक शाळेचे अक्षांश,रेखांश आणि दोन शाळेतील अंतर याची नोंद गटशिक्षणाधिकारी महानुभव आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एच.एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली २२७ प्राथमिक शाळांचे अंतर गुगल मॅपिंगवर अचुक नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी पटसंख्येला आळा बसणार असून एका क्लिकवर दोन शाळेचे अंतर समजणार आहे. गुगल मॅपिंगद्वारे राज्यात पाचवीचे १ हजार ५८८ तर आठवीचे २६० वर्ग सुरू होणार आहेत. केज तालुक्यात पाचवीचे १०७ तर आठवीचे ८ वर्ग मिळून एकूण ११५ वर्ग १६ जूनपासून सुरू होणार आहेत. या वर्गाला अध्यापन करण्यासाठी योग्य त्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे.