शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांचे ११२ कोटींचे कंत्राट रद्द

By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने नुकतेच दिलेले ११२ कोटी रुपयांचे एलईडी पथदिवे बसविण्याचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांनी दिले.

औरंगाबाद : महानगरपालिकेने नुकतेच दिलेले ११२ कोटी रुपयांचे एलईडी पथदिवे बसविण्याचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांनी दिले.शहरातील जुने पथदिवे बदलून नामांकित कंपन्यांचे एलईडी पथदिवे बसविणे, तसेच गंज लागलेले खांब काढून त्या जागेवर नवीन खांब बसविणे आणि पुढील आठ वर्षे शहरातील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासंदर्भात महानगरपालिकेने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर कंत्राट देण्यासाठी १ आॅगस्ट २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पात्र कंपनीकडून निविदा मागविल्या होत्या. दिल्ली येथील मे. इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम प्रा. लि., पॉलिकॅप प्रा.लि. आणि शहा इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. पॉलिकॅप आणि शहा इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना महानगरपालिकेने तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरविले होते. हे कंत्राट दिल्ली येथील मे. इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम कंपनीला देण्यात आले. महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात दोन्ही स्पर्धक कंपन्यांनी औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले. या याचिकांवर एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांच्यासमोर झाली. त्यावेळी हे कंत्राट ११२ कोटी रुपयांचे असले तरी आठ वर्षांत संबंधित कंपनीला तब्बल २६२ कोटी रुपये मनपाकडून मिळणार आहेत. याचिकाकर्त्यांनी न्यायालयास सांगितले की, ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले ती कंपनीही तांत्रिकदृष्ट्या अपात्र आहे. शिवाय स्पर्धक कंपनीची उत्पादनेही बांधकाम विभागाच्या लिस्टवर नाहीत. आपणास मुद्दाम डावलले आहे. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करावे आणि आम्हाला पात्र ठरविण्यात यावे, अशी विनंती केली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ११२ कोटी २१ लाख ६८ हजार ८० रुपयांचे हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच हे कंत्राट देण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती प्रतिवादी कंपनीकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती विनंती मान्य केली नाही. इलेक्ट्रॉन कंपनीकडून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आर.एन. धोर्डे, याचिकाकर्त्या पॉलिकॅप कंपनीकडून अ‍ॅड. रामेश्वर तोतला, अ‍ॅड. अमित व्यास, अ‍ॅड. सुदर्शना निरबाण, शहा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस.यू. कामदार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. पी.एम. शहा, अ‍ॅड. तांदळे, अ‍ॅड. नोहूश शहा, अ‍ॅड. यशशीस कामदार, मनपाकडून अ‍ॅड. नंदकुमार खंदारे, अ‍ॅड. अतुल कराड, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विजय थोरात यांनी बाजू मांडली.कंत्राटदार काय करणार होता?पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी वीज बचत करणार आहे. पथदिव्यांचे वीज बिल ३८ लाखांच्या वर गेल्यास कंत्राटदार स्वत: रक्कम भरील. दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये कंत्राटदाराला पालिका अदा करील. जुनी यंत्रणा अपडेट करील. सध्या १ कोटी रुपये वीज बिल मनपा भरते. रोज पथदिवे सुरू व बंद करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असेल. खांबावरील जाहिरातींचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळेल. शहरातील मुख्य रस्त्यावरील खांब बदलणे, स्वीच बॉक्स, केबल टाकण्याचे काम १ वर्षात कंत्राटदार करील. त्यानंतर वॉर्डातील इन्फ्रा बदलण्याचे काम सुरू होईल, असे शहर अभियंता पानझडे यांनी सांगितले होते.