शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राआधारे १० कोटींचे कर्ज

By admin | Updated: February 18, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : जमिनीचे बनावट खरेदीखत करून दहा कोटी रूपये कर्ज उचलून बोजा ओढत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चौघांविरूध्द मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : जमिनीचे बनावट खरेदीखत करून दहा कोटी रूपये कर्ज उचलून बोजा ओढत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चौघांविरूध्द मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना ३० एप्रिल २०११ ते ४ जून २०११ या कालावधीत उस्मानाबादेतील तलाठी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयात घडली़सुधीर केशवराव पाटील व घनशाम निंबाळकर यांनी नगर पालिका हद्दीतील सर्वे नंबर ११५/ २ मध्ये पाच एकर ९ आर गुंठे जमीन २० जानेवारी २०११ रोजी सर्व अधिकार पत्र धारक सुभाष गायकवाड यांच्याकडून खरेदी केली हाती़ मात्र, जमिनीचे मूळ मालक प्रफुल्ल विठ्ठलराव म्हेत्रे यांनी नरसिंग रामकृष्ण पाटील (रा़समर्थ नगर) व विवेक शंकरराव देशपांडे (रा़आदित्यनगर, गोरखेडा औरंगाबाद) यांना ३० एप्रिल २०११ रोजी खरेदी खताचा बनावट दस्त तयार केला़ तसेच तलाठी महादेव काशिनाथ पाटल यांनी २० जानेवारी २०११ रोजी खरेदीखत फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यासाठी प्राप्त असताना वरील इसमांशी संगणमत करून ३० एप्रिल २०११ रोजी बनावट खरेदीखताची नोंद नरसिंग पाटील व विवेक देशपांडे यांच्या नावे घेतली़ तसेच नरसिंग पाटील, विवेक देशपांडे यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेतन या जमिनीवर १० कोटी रूपये कर्ज घेवून सातबारा पत्रकावर नोंद घेतल्याची सुधीर पाटील यांनी फिर्याद न्यायालयात दिली होती़ न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़