शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. च्या 42 प्रकरणात पंचायत राज समितीकडून ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर व आमदार किशोर दराडे यांच्या गटाने चंद्रपूर, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व कृषी विकास अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील गटात आमदार प्रतीभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व आमदार अमरनाथ राजुरकर यांचा समावेश होता. या गटाने कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात पाहणी केली.

ठळक मुद्देआरोग्य व शिक्षण विभागावर ताशेरे : आक्सापुरातील औषध निर्माता निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंचायत राज समितीने जि. प. च्या लेखापरीक्षा आक्षेपावरील परिच्छेदांची तपासणी केल्यानंतर ४२ प्रकरणात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवल्याचे समजते. दरम्यान, बुधवारी आक्सापूर आरोग्य उपकेंद्रात मुदतबाह्य औषधसाठा आढळल्याने औषध निर्माताला तात्काळ निलंबित केले.पंचायत राज समितीच्या पथकाने बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट दिली. दैनंदिन शालेय कामकाज पद्धती, रेकॉर्ड, भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचा आढावा घेतला. त्यामध्ये निष्क्रीय अधिकाऱ्यांवर पंचायत राज समितीने ताशेरे ओढल्याचे समजते.समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर व आमदार किशोर दराडे यांच्या गटाने चंद्रपूर, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व कृषी विकास अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील गटात आमदार प्रतीभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व आमदार अमरनाथ राजुरकर यांचा समावेश होता. या गटाने कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात पाहणी केली. आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्त्वातील गटात आमदार अनिल पाटील यांचा समावेश होता. त्यांच्याकडून भद्रावती, वरोरा आणि चिमूर तालुक्याची तर आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्त्वात आमदार कैलाश पाटील व आमदार माधवराव जवळगावकर यांनी मूल, सावली आणि पोंभुर्णा तालुक्यात पाहणी केली. आमदार देवराव होळी यांच्या नेतृत्त्वात आमदार कृष्णा गजभे यांनी सिंदेवाही, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्याचा दौरा केला. आरोग्यशिक्षण क्षेत्रातील अनियमितता दिसून आल्याने पंचायत राज समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

दुर्बल घटकांच्या योजनांची तपासणीजि. प. शाळा व आरोग्य केंद्राच्या पाहणीनंतर गोंडपिपरी येथे पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली. राज्य व केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होते की नाही, याची तपासणी केली. कृषी, आरोग्य, सिंचन व दुर्बल घटकांच्या योजनांची माहिती जाणून घेतली. 

 

टॅग्स :Healthआरोग्यEducationशिक्षण