जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:06+5:30

शासन आदेश आल्यानंतर प्राथमिक यादी, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या कामात अधिकारी, कर्मचारी लागले आहे. कोरोना संकटात बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे सुधारित धोरणही निश्चित करुन देण्यात आले आहे.

Z.P. Indications of employee transfers | जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत

जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देविभागप्रमुखांची धावपळ वाढली : १८ दिवसात करावी लागणार बदलीची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात शासनाने नवे आदेश काढले आहे. परिणामी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याचेही संकेत सीईओ राहूल कर्डिले यांनी दिले आहे. त्यामुळे विभागप्रमुखांच्या धावपळी वाढल्या आहेत.
शासन आदेश आल्यानंतर प्राथमिक यादी, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या कामात अधिकारी, कर्मचारी लागले आहे. कोरोना संकटात बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे सुधारित धोरणही निश्चित करुन देण्यात आले आहे.
या बदली प्रक्रियेअंतर्गत संवर्गनिहाय प्राथमिक वास्तव्य, सेवा ज्येष्ठता याद्या तयार कराव्या लागणार आहेत. या प्रसिद्ध झालेल्या सेवा ज्येष्ठता यादीवर आक्षेप व हरकती मागवणे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीचे विनंती अर्ज स्वीकारणे ही प्रक्रिया करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ३१ जुलैपर्यंतत बदली करण्याचे निर्देश असल्यामुळे या सर्व भानगडीमध्ये नेमका कोणाचा नंबर लोगतो, यासंदर्भात अद्यापतरी अनिश्चितता आहे. आक्षेप आणि हरकतींचे निराकारण करुन अंतिम वास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे ज्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, अशाच कर्मचाऱ्यांचा प्रथन नंबर लागेल, असेही बोलल्या जात आहे.
कोरोना संकटात बदलीपासून मुक्ती मिळणार असा कर्मचाºयांचा भ्रम असतानाच नव्या आदेशामुळे मात्र अनेकांची झोप उडाली आहे.

१५ टक्केच्या मर्यादेतच बदल्या
कोरोना महामारीच्या अनुषंगाने विविध विभागाअंतर्गत सुरु असलेल्या उपाय योजनामध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येवू नये,असे निर्देश शासाने जारी केले होते. मात्र नव्या आदेशानुसार ३१ मे २०२० पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या ३१ जुलै २०२० पर्यंत कराव्यात असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. गट क आणि गट ड कर्मचाºयांच्या बदल्या करताना त्या १५ टक्केच्या मर्यादेतच कराव्या, असे निर्देशही देण्यात आले आहे.

कोरोनामुळे यावर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबल्या आहेत. या बदल्या आता ३१ जुलैपर्यंत करण्याचे निर्देश राज्य सरकारने जारी केले आहेत. त्यानुसार कार्यरत केवळ १५ टक्के इतक्याच कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेशात नमूद केले असून आता १८ दिवसांत ही सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे.

कोरोनाच्या कामात अधिकारी, कर्मचारी असतानाच बदल्यांचे आदेश आल्यामुळे अधिकाºयांवर बदल्यांचा मोठा ताण येणार असल्याचे बोलल्या जात आहे.


नेहमी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या बदल्या यावर्षी जुलै उजाडला तरी झाल्या नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल होती. ही चलबिचल सामान्य प्रशासन विभागाच्या ७ जुलै रोजी आलेल्या निर्देशानुसार कमी झाली आहे. या बदल्या कशा आणि किती कराव्यात हे त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित कर्मचाºयांचे विनंती अर्ज त्या-त्या ठिकाणी बजावलेले कर्तव्य आदी बाबींचा विचार करुन या बदल्या होणार आहेत.या बदल्या ३१ जुलैपर्यंत होणार असल्या तरी अद्याप शाळा सुरु न झाल्याने कर्मचाºयांच्या मुलांच्या अ‍ॅडमिशनचा मुद्दा यावर्षी गौण ठरणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये बदली झाल्यास पाल्यांना शाळेत प्रवेश देताना पूर्वी अवघड जात असल्याने अनेक कर्मचारी या आधारे बदल्या बद्द करीत होते.

Web Title: Z.P. Indications of employee transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.