शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्याविरुध्द अ‍ॅट्रासिटी दाखल

By admin | Updated: November 2, 2014 22:31 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे.

कोरपना : राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे.गडचांदूर येथील अमलनाला जलाशयालगत मानोली (खु.) हे आदिवासीबहुल खेडेगाव आहे. येथील आदिवासी बांधव हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार असल्याचे नेहमी विविध निवडणुकांत दिसून येते. यावेळी मात्र विपरीत घडले. अलीकडेच पार पडलेल्या राजुरा विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर या खेडेगावातून काँग्रेस पक्षाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे या गावात वास्तव्य करणारे आणि काँग्रेसचे जि.प. सदस्य नानाजी गोविंदा आदे हे आदिवासी बांधवांवर संतप्त झाले. गावातील सार्वजनिक चौकात बसून असलेल्या माणकू भिकाजी कुळमेथे या आदिवासी बांधवास कथितरीत्या जातीवाचक शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.सदर घटनेच्या अनुषंगाने गावातील आदिवासी बांधव एकत्र येऊन त्यांनी त्याच दिवशी अर्थात १६ आॅक्टोबरला गडचांदूर ठाण्यात फिर्याद दिली. सदर प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी दोन दिवस चौकशी केल्यानंतर १८ आॅक्टोबरला आरोपी नानाजी गोविंदा आदे याच्याविरूद्ध अपराध क्र. ३०२८/१४ कलम २९४, ५०६ भादंवि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) आर.एस. नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे समजताच आरोपी फरार झाला. घटनेला १५ दिवस लोटूनही अद्याप आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले नाही. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)