Youth Workout for Police Recruitment | पोलीस भरतीसाठी तरुणाईची कसरत
पोलीस भरतीसाठी तरुणाईची कसरत

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेच्या अध्यासाला वेग : पहाटेपासून विविध व्यायाम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून पाहिते तशी भरती प्रक्रिया सुरु नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. त्यामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे काही युवक पोलीस भरतीकडे वळले. मात्र पोलीस भरतीही होत नसल्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. दरम्यान, काही दिवसापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात निघाली आणि या युवकांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासोबत पहाटेपासून शारिरीक क्षेमतेसाठी व्यायामही सुरु केल्याचे चित्र सध्या शहरातील विविध भागात बघायला मिळत आहे.
शहराबाहेरील रस्त्यावर युवक सकाळी सायंकाळी धावून सराव करीत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या मैदानावर हिवाळ्याची चाहूल लागल्याने तसेच पोलीस भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी कसरत सुरु केल्याचे दृश्य दिसत आहे.
थंडी वाढू लागल्याने सकाळ- सायंकाळी मैदानांवर मोठी गर्दी वाढली आहे. अनेक युवकांचा यात सहभाग असतो. पोलीस भरतीमध्ये आपला नंबर लागावा या आशेवर ग्रामीण तसेच शहरातील तरुण वर्ग कामाला लागले आहे. यासासाठी ते मोठे परिश्रम घेत आहे. चांगली शारिरीक क्षमता असणाऱ्या तरुणाचा कल आर्मी तसेच पोलीस दलाकडे आहे.

लेखी परीक्षेची तयारी
सकाळी, सायंकाळी मैदानावर सराव सुरु आहे. त्याचबरोबर अर्ज केलेले युवक लेखी परिक्षेसाठी दिवसभर अभ्यासाची तयारी करीत आहेत. सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान या विषयकाचा समावेश असणाºया पुस्तिकांचा आधार घेऊन अभ्यासावरही तरुणानी लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या वाढलेल्या बेरोजगारीत युवकांना ही पोलीस भरती, आर्मी रेल्वे भरती आशेचा किरण ठरत आहेत. स्थानिक वाचनालयांमध्येही तरुणांची गर्दी बघायला मिळत आहे. चंद्रपूर शहरातील बहुतांश वाचनालयामध्ये गर्दी झाली असून शासकीय तसेच काही खासगी वाचनालयामध्ये युवक सकाळपासून अभ्यास करीत आहे.

Web Title: Youth Workout for Police Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.