शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावे

By admin | Updated: October 11, 2016 00:54 IST

आजचा युवक हा भविष्य काळात देशाचे नेतृत्व करणार असल्याने त्यांच्या अंगी विविध कलागुणांसोबत संस्कार देखील महत्त्वाचे आहेत.

संजय मारकवार : मूल येथे युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम मूल : आजचा युवक हा भविष्य काळात देशाचे नेतृत्व करणार असल्याने त्यांच्या अंगी विविध कलागुणांसोबत संस्कार देखील महत्त्वाचे आहेत. विविध स्पर्धा परिक्षेतून त्यांनी स्वत:ला कणखर बनविले पाहिजे. तोच युवक देशाचा आधारस्तंभ ठरणार असल्याने युवकांनी समाजहिताच्य दृष्टीने कार्य करावे, असे मत पंचायत समिती मूलचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पाटील मारकवार यांनी केले. मूल येथे आयोजित युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे व संस्कार फाऊंडेशन मूलच्या वतीने युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत मनियार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उपन्न बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, हसन वाढई, तालुका पत्रकार संघाचे संजय पडोळे, पत्रकार दीपक देशपांडे, गंगाधर कुनघाडकर, अशोक येरमे, अल्का राजमलवार, संस्कार फाऊंडेशन मूलचे अध्यक्ष राजू गेडाम आदी उपस्थित होते.यावेळी देश विकासाला युवकाचे योगदान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘एड्स’ या विषयावर प्रा. चंद्रकांत मनियार व युवा नेतृत्व या विषयावर दीपक देशपांडे यांनी मार्गदशन केले. विजेत्या स्पर्धकांना नगर परिषद आरोग्य सभापती प्रशांत समर्थ यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आली. परिक्षणाचे काम अशोक येरमे व अल्काताई संगमवार यांनी केले. संचालन बंडु अल्लीवार व उपस्थितांचे आभार आशिष मालोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोर्डावार, प्रशांत मेश्राम, शिवम गेडाम आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)