शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना लागली मुक्ताईची ओढ

By admin | Updated: July 28, 2014 23:27 IST

जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे.

खडसंगी : जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे. मुक्ताईच्या प्रेमापोटी दूरवरुन युवक वाटेल ती किंमत मोजून मुक्ताईच्या कुशीत विसावत आहेत.आषाढ महिन्यात पावसाच्या सरींनी वसुंधरेला न्हाहू घातल्यावर तिच्यावर हळुवार हाताने साज चढवून तिला अलंकारीत करण्याचे काम श्रावणवर सोपविले आहे. याच महिन्यात धरती पावसाच्या जलधारा उरात साठवून हिरवा गालिचा परिधान करते. मानवाच्या मनाला भुरळ पाडली जाऊन मानवाचे मन आनंदी करुन ते प्रेमाने न्हाहुन निघते. मशागत करुन पेरणी करत तृप्त झालेली माती जसे नवे अंकुर घेऊन तरतरुन येते. तशीच काहीशी अवस्था मनाचीही या श्रावण महिन्यात झालेली असते आणि मग मन मानत नसल्याने मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद घेण्याच्या तयारीला लागतो.पावसाळा सुरू झाला धबधब्यावर किंवा धरणावर जाण्याचा बेत प्रत्येकाचा असतो. ‘मुक्ता’ईच्या धबधब्यात वातावरण उत्साह वाढविणारे असल्याने निसर्गप्रेमींना सध्या मुक्ताई चांगलीच भुरळ पाडत आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूर- डोमापासून तीन किमी अंतरावर मुक्ताई हा धबधबा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर अनेकांना आकर्षित करीत आहे. ३० ते ४० फूट उंचीवरुन पडणारे पाणी, त्यामुळे हवेत उडणारे पाण्याचे तुषार, हे पाहण्यासाठी पर्यटकांचे जत्थे मुक्ताईकडे येत आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत.मुक्ताईच्या डोंगर कुशीत असलेला आजूबाजूचा परिसर मनाला प्रसन्न करुन टाकते. त्यामुळे मुक्ताईने परिसरातीलच नव्हे तर दूरवरच्या युवकांना भुरळ पाडली आहे. (वार्ताहर)