आंदोलन करणाऱ्या कामगारांना अटक

By Admin | Updated: December 13, 2014 01:16 IST2014-12-13T01:16:09+5:302014-12-13T01:16:09+5:30

पद्मापूर-दुर्गापूर कोळसा खाणीमध्ये कार्यरत असलेल्या हेमकुंड कोल कॅरियर्स प्रा. लि., शंखमुगम कोल कॅरियर्स प्रा. लि....

Workers arrested for the agitation | आंदोलन करणाऱ्या कामगारांना अटक

आंदोलन करणाऱ्या कामगारांना अटक

चंद्रपूर: पद्मापूर-दुर्गापूर कोळसा खाणीमध्ये कार्यरत असलेल्या हेमकुंड कोल कॅरियर्स प्रा. लि., शंखमुगम कोल कॅरियर्स प्रा. लि. तथा शेरावाली कोल कॅरियर्स प्रा. लि. या कंपनीमध्ये कार्यरत कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले. सदर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी अटक केली. ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे कामगारांवर अन्याय करीत असून कंपनीचे कंत्राट बेकायदेशीर असल्याचा आरोप भारतीय कोळसा खदान मजदूर संघाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
काही दिवसापूर्वी १९ कामगारांना कामावर काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संतापले असून त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेत आंदोलन सुरु केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकारी कामगारांना सकाळी ११ वाजता अटक केली. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवून रात्री न्यायालयात हजर केले. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. ४४ कामगारांना नागपूर येथे तर ४० कामगारांना चंद्रपूर येथील कारागृहात पोलिसांनी पाठविले आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Workers arrested for the agitation