शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कापसी कालव्यावरील काम अपूर्णावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:33 IST

Chandrapur : चार गावांतील सिंचन व्यवस्था संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील गावाशेजारून गुरे-ढोरे व लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दोनशे मीटर लांबीचा बोगदा (सुरक्षा कवच) निर्माण करण्याचे काम कापसी गावाशेजारी मे महिन्यापासून सुरू आहे. ते काम कासवगतीने सुरू असून अपूर्णावस्थेत असल्याने त्या कालव्यातून पाणी पुढे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या चार गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहणार आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील क्षेत्रात शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेले लहान-मोठे कालव्यांचे जाळे संपूर्ण सावली तालुक्यात पसरले आहे. अनेक कालवे गावाशेजारून नागरिक व गुरे - ढोरे ये-जा करण्याच्या मार्गावरून गेले आहेत. मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने आणि कालव्यांचा आतील भाग सिमेंट काँक्रिटचा बनविण्यात आल्याने पाळीव आणि जंगली प्राण्यांना कालवा ओलांडून पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत असे. पावसाच्या वेळी तर अनेक जनावरे कालव्यांत फसण्याची भीती निर्माण झाली होती. तर गावाशेजारून गेलेल्या कालव्यामुळे गावातील लहान मुले आणि गावातील गुराढोरांना कालव्यात पडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने अशा कालव्यांवर गावाशेजारी कमीतकमी दोनशे मीटरचे सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी एका कंपनीकडे काम सोपविले. परंतु ती कंपनी हे काम कासवगतीने करीत असल्याने ते काम अपूर्ण असून कालव्यावर लावण्यात आलेले लोखंडी सळाखे मोकळी आहेत.

कालव्याचे पाणी पुढे जाण्यास अडचणया कालव्याच्या पुढे जाणारे पाणी, पाण्याच्या प्रवाहाने येणारा कचरा या ठिकाणी साचणार असल्याने कालव्याचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. परिणामी या कालव्यावरील येणाऱ्या उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण कामामुळे गावातील नागरिक, लहान मुले, जनावरांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर