शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

हिरापूर येथे महिला शेतकरी प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

कोरपना : स्त्री शक्ती महिला ग्रुप, हिरापूर व कृषी विभाग, कोरपना यांच्या सयुक्त विद्यमाने हिरापूर येथे महिला शेतकऱ्यांचे ...

कोरपना : स्त्री शक्ती महिला ग्रुप, हिरापूर व कृषी विभाग, कोरपना यांच्या सयुक्त विद्यमाने हिरापूर येथे महिला शेतकऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. हिरापूर येथील भगवान बोबडे यांच्या शेतावर आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाताई काळे होत्या. यावेळी व्यासपीठावर कोरपना तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले, कृषी सहाय्यक रेणुका कोकणे, बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख, पोलीस पाटील योगिता टिपले, सहाय्यक शिक्षक प्रशांत गोखरे, सहाय्यक शिक्षक सुनील अलोणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव वाघमारे उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात उपविभागीय कृषी अधिकारी मोरे यांनी शासकीय योजना, हरभरा, सोयाबीन बीज उत्पादन, सेंद्रिय भाजीपाला लागवड, टार्यकोकार्ड चिलोणीस सापळे कसे बनवावे, याविषयी मार्गदर्शन केले. बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांनी बहुपीक पद्धतीने भाजीपाला लागवड, वनस्पतीजन्य कीटकनाशक घरच्या घरी तयार करण्याबाबत माहिती दिली.

यावेळी हिरापूर येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन बबिता वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक लता काळे यांनी केले. जयश्री डाहुले यांनी आभार मानले. या शिबिरासाठी स्त्री शक्ती महिला ग्रुपच्या संगीता चटप, विनिता काळे, मनिषा बदकी, मनिषा सिडाम, सुवर्णा सिडाम, दिशा काळे, सुवर्णा ठाकरे, वैशाली चौधरी, शारदा मडावी, संगीता कामटकर, तेजल टिपले, माया सिडाम, उषा डाहुले, मंथना पुनवटकर, निर्मला आत्राम, मनिषा जोगी, माधुरी कन्नाके, तेजस्विनी बोबडे, अर्चना बल्की, मीरा मडचापे, रेश्मा डाहुले यांनी सहकार्य केले.