लाच घेताला महिला लिपिकेला अटक

By Admin | Updated: December 23, 2014 23:02 IST2014-12-23T23:02:23+5:302014-12-23T23:02:23+5:30

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील महिला लिपिक गीता प्रकाश पौनीकर हिला दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

The woman's scribe taking the bribe was arrested | लाच घेताला महिला लिपिकेला अटक

लाच घेताला महिला लिपिकेला अटक

शिक्षण व प्रशिक्षण संस्था : दोन हजारांची लाच
चंद्रपूर : येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील महिला लिपिक गीता प्रकाश पौनीकर हिला दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ येथे गीता प्रकाश पौनीकर लेखापाल म्हणून कार्यरत आहे. मागील चार वर्षांपासून शासकीय कार्यालय, महाविद्यालयांना विविध प्रकारची स्टेशनरी पुरविण्याचे काम एका कंत्राटदाराकडून करण्यात येते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेलाही प्रिंटीग व स्टेशनरी साहित्य पुरविण्यात येत होते.
संस्थेकडे या साहित्याचे बील प्रलंबित होते. त्यातील २५ हजार ५४२ रुपयाचे बिल नुकतेच मंजुर झाले. त्यानंतर पौनीकर यांनी तक्रारदारास फोन करून धनादेश नेण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे बजावले.
दोन हजार रुपये न दिल्यास धनादेश देणार नाही, असे पौनीकर यांनी म्हटल्यामुळे निराश झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारताना पौनीकर यांना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार, अजय भुसारे, सुरेंद्र खनके, मनोज पिदूरकर, संदीप वासेकर, महेश मांढरे, अरुण हटवार यांनी सदर कारवाई केली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The woman's scribe taking the bribe was arrested