शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम अपडेट’च्या नावाखाली महिलेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:38 IST

एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी खात्यासंबंधी वैयक्तिक माहिती विचारून महिलेच्या खात्यामधून ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सावली येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

सावली येथील घटना : बनावट फोनकॉलद्वारे ४० हजारांनी फसवणूकचंद्रपूर : एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी खात्यासंबंधी वैयक्तिक माहिती विचारून महिलेच्या खात्यामधून ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सावली येथे नुकतीच उघडकीस आली आहे. वैशाली उमेश अलचावार असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.सावली येथील रहिवासी उमेश अलचावार यांचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. ते भविष्यासाठी व्यवसायातून नियमित बचत करतात. ती रक्कम पत्नी वैशाली अलचावर यांच्या आयडीबीआय बॅकेच्या खात्यावर जमा करीत होते. मात्र अलचावार यांना २१ जानेवारीला ९७०९३८५३९१ या क्रमांकावरुन फोन आला. आपण आयडीबीआय बॅक मुंबईचे मुख्य अधिकारी शर्मा बोलत असल्याची माहिती दिली. तुमचा एटीएम लॉक झालेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला अपडेट करावा लागेल, असे सांगून त्यांचा खाता क्रमांक विचारला. वैशालीचे पती उमेश यांंनी आम्ही बॅकेत संर्पक करुन आमचे एटीएम सुरु करु, असे त्याला सांगितले. मात्र त्या भामट्या अधिकाऱ्याने तीन ते चार वेळा फोन करुन आजच बॅकेचे काम करणे गरजेचे असल्यामुळे खाते क्रमांक विचारला. वैशालीच्या पतीने बँक खाते क्रमांक दिल्यावर एक मॅसेज पाठवून त्या मॅसेजमधील ओटीपी क्रमांक विचारला. अलचावार यांनी तो क्रमांक त्याला सांगितला. त्यानंतर १८ फेब्रवारीला ते बॅकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याची माहिती बॅक अधिकाऱ्यांनी अलचावार यांना दिली. त्यामुळे अलचावरला धक्काच बसला. अलचावारने आपल्या खात्यात ४० हजार रुपये असल्याचे सावली येथील बॅक अधिकाऱ्याला सांगीतले. मात्र बॅक अधिकाऱ्यांनी त्यांना स्टेटमेंट दाखवत २१ जानेवारीला १० हजार, २२ जानेवारीला १० हजार, २३ जानेवारीला १० हजार, २४ जानेवारीला पाच हजार, २५ जानेवारीला पाच हजार याप्रमाणे पैसे काढल्याची माहिती दिली. मात्र अलचावार यांनी अधिकाऱ्यांना आपण हे पैसे काढले नसल्याचे सांगितले. या संदर्भात मुंबई आयडीबीआय बॅकेतून आपल्याला फोन आला होता. त्यामुळे आपण खाते क्रमांक व त्यानंतर पाठवलेल्या मॅसेजमधील ओटीपी क्रमांक त्यांना सांगितली, अशी अलचावार यांनी माहिती दिली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने फसवणूक करुन पैसे काढल्याची माहिती दिली. बँक अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला. अलचावार यांनी आपल्या पत्नीला घेऊन सावली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या सर्व घडामोडीत अलचावार यांनी भविष्यासाठी बचत करुन ठेवलेली रक्कम अचानक लंपास झाल्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. (नगर प्रतिनिधी)