शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या मुद्यावरून महिलेला बेदम मारहाण

By admin | Updated: March 8, 2015 00:34 IST

जिल्हा दारूबंदी समितीची अध्यक्ष असूनही गावातील अवैध दारू विक्री का बंद करीत नाही, असा सवाल करून गावातील तिघांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना...

भद्रावती : जिल्हा दारूबंदी समितीची अध्यक्ष असूनही गावातील अवैध दारू विक्री का बंद करीत नाही, असा सवाल करून गावातील तिघांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चालबर्डी या गावी शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी घडली. या मारहाणीत सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.तालुक्यातील चालबर्डी येथील रहिवासी तथा जिल्हा दारूबंदी समितीच्या स्थानिक अध्यक्ष संध्या प्रदीप राऊत (२८) शुक्रवारी सकाळी ११ वाजता शौैचावरून घरी परत येत असताना तीन इसमांनी त्यांना रस्त्यात अडविले. तु दारूबंदी समितीची अध्यक्ष आहे तर गावातील अवैध दारूविक्री का बंद करीत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यानंतर संध्या राऊत घरी परत आल्या. दरम्यान, गावातील रामकिसन महादेव भडमाडे (२६), शालिक उद्धव शेरकुरे (४२) आणि महादेव मडमाडे (४६) हे तिघेही तिच्या घरी गेले. तेथे त्यांनी याच मुद्यावरून वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की, या तिघांनी संध्या राऊत यांच्यावर लोखंडी सळाखीने हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले. संध्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध भांदवि ४५२, ३२४ अन्वेय गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)पारोमिता गोस्वामी यांची चालबर्डीला भेटया घटनेची दखल घेत जिल्हा दारूबंदी समितीच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी गावाला भेट दिली. घटनेबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ठाणेदारांची भेटसुद्धा घेऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना अतिशय गंभीर असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. मोहबाळ्यात ‘अण्णा’ची दहशततालुक्यातील मोहबाळा या गावातील तंटामुक्ती समितीचा माजी अध्यक्ष अण्णा राजु स्वामी हा गेल्या अनेक वर्षांपासून या गावात अवैधरित्या दारूची विक्री करीत आहे. तो हा व्यवसाय आपल्या दहशतीने चालवितो. त्याच्या या दहशतीची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरुन त्याला अटक करण्यात आली.