शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देकापसाची कवडीमोल भावात खरेदी : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.यावर्षी राजुरा तालुक्यात २८ हजार ५५० हेक्टरवर कापूस पिकांची लागवड केली. अकाली आलेल्या पावसाने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उसंतीनंतर शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी करायला सुरुवात केली आहे. काही शेतकरी आर्थिक अडचणीपोटी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहे. मात्र त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात असून कापसाला पाच हजार ५४० रुपये हमीभाव असताना खासगी व्यापारी चार हजार ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी करीत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.खासगी कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने खासगी व्यापारी कापसाची अक्षरश: लूट करीत आहे. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसाने आधीच शेतकरी होरपळला असताना खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे झाडावरच सडली तर कापूस काळा पडला. त्यामुळे शेतकºयांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. असे असताना खासगी कापूस संकलन केंद्रावर कापूस घेऊन जाणाºया शेतकºयांना ओला कापूस असल्याचे कारण सांगत कापसाला खासगी व्यापारी कवडीमोल भाव देत आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.हमी भावापेक्षा पाचशे,हजार रुपयांच्या फरकाने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. दरवर्षी शेतकरी कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु शेतकरी दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटात सापडतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीही धाऊन जात नाही, हे वास्तव आहे. राजकीय पुढारी शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष द्यायला तयार नाही. निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेते शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला तयार नाही.त्यामुळे शेतकरी केविलवाना झाला आहे. निसर्ग साथ देत नाही, सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देत नाही. खासगी व्यापारी शेतमालाची कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शेतकरी निराधार झाला आहे. त्याला यावेळी मोठ्या आधाराची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांच्या मदतीसाठी आता कोण पुढे येते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू करावेखासगी व्यापारी कपसाची कवडीमोल भावात खरेदी करून अक्षरश: लूट करीत असताना राजुरा तालुक्यात शासनाने अद्यापही कापूस खरेदी संकलन केंद्र सुरू केले नाही. याचा फायदा खासगी व्यापारी घेत असून कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे राजुरा तालुक्यात सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती