शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे भोग कधी संपणार ?

By admin | Updated: October 7, 2015 02:11 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

नांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्त्यांचा भोग कधी संपणार अशी संतापजनक प्रतिक्रिया आता नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे. तालुक्यातील गडचांदूर-भोयगाव, गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-वनोजा-वणी, कोरपना-कोडशी-वणी, कोरपना-आदिलाबाद, गडचांदूर -देवाडा आदी मुख्य रस्ते खड्यांनी वेढलेले दिसत आहे. या आधीही सदर रस्त्यांच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. यातच पोचमार्गाचीही अवस्था अत्यंत बिकट असून गेल्या दहा वर्षापासून अनेक पोचमार्ग डांबरीकरणाविनाच आहे. यामध्ये नांदा-लालगुडा, बाखर्डी-नांदा, बाखर्डी-निमनी-गोवरी, कढोली-आवारपूर-वनोजा, नांदाफाटा -पिंपळगाव तथा कोरपना परिसरातील अनेक मार्गाची अवस्था बिकट आहे. याआधी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी कोटी रुपये खर्च झाल्याचा गाजावाजा केला. काही ठिकाणी विकासाचे मोठ-मोठे फलकही लावण्यात आले. परंतु, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न आजही कायम दिसत आहे. याचाच परिणाम औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागात अधिक होत आहे. नांदाफाटा-नारंडा-वनसडी-अंबुजा, माणिकगड नजीक मुख्य रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना यापूर्वी जीवही गमवावा लागला आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल का, असा प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारत आहे. (वार्ताहर)एकाच कंत्राटदाराला पाच ते सहा कामेतालुक्यातील अनेक गावात १३ व्या वित्त आयोग योजनेतील कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये बांधकाम विभागातील अभियंता व अधिकारी काही कंत्राटदारांना हाताशी धरुन कामे करीत असल्याचे समजते. दुसरीकडे कामे करीत असलेल्या कंत्राटदाराचे काम मध्येच बंद करून आपल्या नजीकच्या कंत्राटदाराकडे कामाचा कंत्राट दिला जात आहे. त्यामुळे एकच कंत्राटदार पाच ते सहा गावाची कामे करताना दिसत आहे. पोलिसांचे दुर्लक्षतालुक्यात चार सिमेंट कंपन्या असल्याने दर दिवशी हजारो चार-चाकी वाहने मुख्य रस्त्यावरुन ये-जा करतात. यातील अनेक वाहने ओव्हरलोड असल्यानेही रस्त्यांची अवस्था बिकट होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे.आंदोलनाचा इशारातालुक्यातील मार्गाची दुरुस्ती न झाल्यास येत्या पंधरा दिवसात आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी प्रभाकर दिवे, मदन सातपूते, गजानन पंधरे, आशिष मुसळे, राजूरकर आदींनी दिला आहे.मागणीकडे दुर्लक्षयापूर्वी पोचमार्गाची व मुख्य रस्त्याची डागडुजी अनेकदा करण्यात आली. यामध्ये जवळील उपलब्ध मुरुम, तर कुठे लाल माती, गिट्टी खड्यांमध्ये भरुन कागदोपत्री खडीकरण व डागडुजी दाखविण्यात आली. याबाबत नागरिकांनी मागणी लावून धरली. परंतु, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा वर्दहस्त आहे.कामाचा निकृष्ट दर्जाअनेक गावामध्ये रस्ते बनविताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. काही कंत्राटदार जाणीवपूर्वक हे काम करीत असताना अधिकारीही डोळेझाक करताना कामावरून दिसत आहे.