शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

घोडाझरी अभयारण्याची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:00 AM

महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवप्रेमी व पर्यटकांची मागणी : सोईसुविधा उपलब्ध करून पर्यटन सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घोडाझरी अभयारण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून येथे पर्यटन सुरू करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे.घोडाझरी हे नागभीड तालुक्यात येत असलेले व पूर्व विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथील विपूल वनसंपदा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि पशूपक्ष्यांचा अधिवास लक्षात घेऊन राज्य शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून या अभयारण्याच्या सीमाही निश्चित केल्या आहेत.या सीमांकनानुसार उत्तर दिशेला रेंगातूर गावाची दक्षिण पश्चिम सीमा व वनखंड क्रमांक ४१ ची उत्तर पूर्व सीमा, पूर्वेस कुनघाडा, रेंगातूर, पेंढरी, कसर्ला, डोंगरगाव नवखळा, तिव्हर्ला तुकूम, कोदेपार, धामनगाव, धामनगाव चक व नागभीडची हद्द तसेच वनखंड क्रमांक ६०४ पी, ६३४, ६३५ पी, ८७ पी, ८५ या वनखंडाची सीमा. दक्षिणेस चिंधीचक, किटाळी चक,किटाळी तुकूम, हुमा, घोडाझरी, खडकी तुकूम, गोविंदपूर, सोनापूर व येनोली, धामनगाव व धामनगाव चक, कचेपार गावाची सीमा, घोडाझरी तलाव सीमा तसेच वनखंड क्रमांक ५५, ६४, ७१, ६७ पी, ७८ ची सीमा. पश्चिमेस काजळसर, अडेगाव,सारंगड, लाव्हारी, मदनगड, डोंगरगाव, महारमजरा, डोमा, चक जट्टेपार , चक लोहारा, कवडसी, दहेगाव, झरी, येरवा या गावांच्या सीमा तसेच वनखंड क्रमांक ३८, ३९ पी, ४५६ पी, ६१, ५०३, ४५५, ४७५, ४७४, ४६२, ४६३, ३२१, ४७४ पी, ४७८, ४८६ च्या सीमा ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. या बाबीस आता नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी होत असला तरी अभयारण्याची देखभाल करणारे वन्यजीव कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने काहीच हालचाली अद्याप दिसत नाही.वन्यजीव कार्यालय स्थापनेला विलंबया अभयारण्याच्या देखभालीसाठी वन्यजीव कार्यालयाची निर्मिती करणे गरजेचे असले तरी आद्यापही या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली नाही. सध्या या अभयारण्याची देखभाल नागभीड, तळोधी व चिमूर ही प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय करीत आहेत.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरण