शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ओलित शेती विकताना दीडपट कर

By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST

ज्यांच्या शेतात ओलिताची साधने आहे, आणि त्याची नोंद सरकारी दप्तरावर आहे, अशा शेतीत शेतकरी ओलिताने पिके घेत आहेत.

वरोरा : ज्यांच्या शेतात ओलिताची साधने आहे, आणि त्याची नोंद सरकारी दप्तरावर आहे, अशा शेतीत शेतकरी ओलिताने पिके घेत आहेत. मात्र, शासन अकाली नुकसान देताना या शेतीला कोरडवाहू शेतीचे निकष लावून मदत देत आहे. तर ओलिताची शेती विकताना कोरवाडू शेतीच्या दीडपट कर शेतकऱ्यांना अदा करावे लागते. या निकषामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कुंचबना होत आहे.चालु वर्षातील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरण्या करावे लागले. त्यातच सोयाबीन बियाणाची उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीक हाती आले नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. प्रति हेक्टर ४ हजार ५०० रुपये अशी शासनाची आर्थिक मदत आहे. त्यात दोन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना नऊ हजार रूपयांपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, कालवा, नहर, बोअरची शेतात सोय होती त्या शेतकऱ्यांनी विशेषत: कपाशीला पाणी व खत दिले. त्यामुळे त्याचा खर्चही अधिक झाला. त्यामुळे ज्या शेतातील ओलिताच्या साधनाची सातबारावर नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना ओलिताची मदत देणे गरजेचे असताना त्यांनाही कोरडवाहू जमीन ठरवून मदत दिली जात आहे. त्यामुळे ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जाते आहे. शेतीत ओलिताची सोय आहे आणि त्याची सातबारावर नोंद असल्यास शेती विकताना कोरडवाहू शेतीच्या दीडपट स्टॅम्प ड्युटी अदा करावी लागते. मात्र मदत देताना कोरडवाहूचा निकष लावला जात असल्याने या निकषाने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. (तालुका प्रतिनिधी)