शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर शहरासाठी इरई धरणातून पाणी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त्यामुळे, सध्यातरी येथे पाण्याची टंचाई नाही. शहराला आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे.

ठळक मुद्देटंचाई निर्माण झाल्यास पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जातो. त्याकरिता शहराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून पाणी उचलले जाते. यासाठी पात्रात तीन विहिरी आहेत. आता पाण्याची पातळी घटत असल्याने बल्लारपुरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. असे झाल्यास इरई धरणातून पाणी घेण्याची तयार मजीप्राने केली आहे.वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त्यामुळे, सध्यातरी येथे पाण्याची टंचाई नाही. शहराला आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे. मात्र, यंदा उन्हाळा चांगलाच तापत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी अधिक खालावत जावून टंचाई निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास यावर मजिप्राने इरई धरणातून पाणी घेण्याचा पर्याय ठेवला आहे. पाण्याबाबत अशी आणीबाणी निर्माण झाल्यानंतर इरई धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडून ते विहिरीने उचलायचे असे ठरले आहे व तशी तयारी करून ठेवली असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांनी'लोकमत'ला दिली आहे. दोन वर्षांपूर्वी, पाणी टंचाईत इरई धरणामधून पाणी उचलावे लागले होते, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :DamधरणWaterपाणी