शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: April 2, 2015 01:26 IST

जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ दरवर्षी सोसावी लागत आहे. यावर्षीही हिच परिस्थिती उद्भवली असून तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.

जिवती : जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ दरवर्षी सोसावी लागत आहे. यावर्षीही हिच परिस्थिती उद्भवली असून तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या टँकरही पूरवू असे सांगण्यात येते. पण याची मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील माराई पाटण येथील माराई देवीचे तिर्थस्थळी येणाऱ्या भाविकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावात पाणी समस्या असली तरी तीर्थस्थान माराई पाटण येथे पैसा द्या, पाणी घ्या हा प्रकार सर्रास सुरू आहे. या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. जवळपास एक महिना ही यात्रा चालत असते. मात्र येथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. यात्रेत एक हंडा पाण्यासाठी २० ते ३० रुपये मोजावे लागत आहे. यात्रेदरम्यान तरी प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. मात्र असे कधीच झालेले नाही.मंदिराच्या बाजूलाच एक हातपंप असून हा हातपंप यात्रा काळातच बंद आहे. हातपंपाचे हॅन्डल गायब असून भाविकांसाठी तो हातपंप एक देखावाच ठरत आहे. स्थानिक ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी भाविकांची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)